‘माझा बूथ – माझी जबाबदारी’ मिशन मोडवर राबवा

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

मी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. माझ्या आमदारकी आणि मंत्री पदासाठी जनतेच्या प्रेमासह कार्यकर्त्यांची खंबीर साथ हीच माझी खरी श्रीमंती आहे. त्यासाठी प्रत्येक गणनिहाय बैठका घेणार आहे. त्यामुळे त्या-त्या पदाधिकाऱ्यांचे ऑडिट होणार आहे. प्रत्येक बुथ प्रमुखांनी ‘माझा बूथ-माझी जबाबदारी’ मिशन मोडवर राबवावे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे शिवसेनेच्या तालुकास्तरीय मेळाव्यात बोलत होते.

यावेळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, शेतकी संघाचे संचालक, घोषित झालेल्या धरणगाव तालुक्यातील आत्मा कमेटीतील अध्यक्ष व सदस्यांचा तसेच आदर्श शिक्षक भैया मराठे आणि राज्यस्तरीय जीवन पुरस्काराने सन्मानित केलेले भानुदास विसावे यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, गजानन पाटील, डी. ओ. पाटील, सचिन पवार, मुकुंद नन्नवरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, खान्देशची ओळख असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. मतभेद विसरून एकजुटीने पक्ष संघटन बांधणीसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.

यांचा झाला शिवसेनेत प्रवेश

धरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनवणे यांच्यासह पारधी समाजाचे प्रवीण पारधी, आनंद पारधी, प्रदीप पारधी, सुरेश पारधी, अमृत पारधी, सुनील जाधव, अरुण जाधव, बबलू पारधी, गणेश पारधी यांच्यासह अनेकांनी शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करून पक्षात स्वागत केले. प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, सूत्रसंचालन युवासेनेचे भैया मराठे तर आभार शहर प्रमुख विलास महाजन यांनी मानले.

यांची होती उपस्थिती

शिवसेनेच्या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, विधासभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, मार्केटचे गजानन नाना पाटील, मागासवर्गीय सेनेचे युवासेनेचे तालुका प्रमुख दीपक भदाणे, जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे, शहर प्रमुख विलास महाजन, तालुका संघटक रवी चव्हाण, महिला आघाडीच्या प्रिया इंगळे, भारती पवार, ज्येष्ठ शिवसैनिक देविदास भदाणे, दामूअण्णा पाटील, भगवान महाजन, सचिन पवार माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, मोतीआप्पा पाटील यांच्यासह तालुक्यातील शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here