साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी अनिस मणियार यांची नुकतीच निवड करण्यात आली. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून अनिस मणियार हे भाजपचे कार्यकर्ते आहे. ते यापूर्वी अल्पसंख्यांक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्त होते. आता पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून अल्पसंख्यांक आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खा.उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, अल्पसंख्यांकाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण, पाचोरा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे, तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, सरचिटणीस वसंत पाटील, अनिल नेरकर, विनोद नेरकर, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष आसीफ मणियार, ग्रामपंचायत…
Author: Sharad Bhalerao
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे ५६० बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये किमतीचे बांधकाम उपयोगी किट आणि गृहोपयोगी संच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच वितरित करण्यात आले. बांधकाम कामगारांना उपयुक्त असे किट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. याबद्दल कामगारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, शिरसोली, वावडदा येथेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ५०० किटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशांत झंवर, गुलाब माळी, दिलीप महाजन, अनिल महाजन, सचिन भोई, बळीराम कोळी, दिनेश कडोसे, गौरव महाजन, अरुण पाटील, योगेश माळी, कर्मा मामा, चंदू इंगळे, दीपक कोळी, जीपीएस मित्र परिवार यांच्यासह कार्यकर्ते…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात सालाबादप्रमाणे तिथीनुसार यंदाही २८ मार्च २०२४ रोजी शिवसेना उबाठातर्फे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना उबाठाचे जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नाना कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी, १३ मार्च रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीत शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी किरण आढाव यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत उपप्रमुखपदी चेतन कुमावत, हेमंत साळकर, सचिवपदी जितेंद्र (रॉकी) धामणे, सहसचिवपदी चेतन आढाव, ऋषिकेश देवरे, खजिनदार भिमराव खलाणे, सहखजिनदार महेंद्र जयस्वाल यांचा निवडीत समावेश आहे. बैठकीत सर्वांनी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील बी. पी. आर्टस्, एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेजमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. अजय काटे होते. यावेळी उत्सव समिती प्रमुख प्रा.अंकुश जाधव, प्रा. डॉ. शशिकांत भामरे, एन.एस.एस. प्रमुख प्रा. रवींद्र बोरसे, डॉ. दीपक पाटील डॉ. अर्चना कुलकर्णी, श्रीमती मराठे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अजय काटे यांनी मनोगत व्यक्त करुन यशवंतराव चव्हाण यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी हेमंत…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर जामनेर तालुक्यातील नांद्रा येथील प्रगतीशील शेतकरी दिवाकर पाटील यांच्या शेतात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत गाव पातळीवर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माती पुजनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी विकासोचे व्हा.चेअरमन धनसिंग पाटील होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सुभाष अहिरे यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. रासायनिक शेतीतील उत्पादित शेतमालाचे शरीरावर होणारे अपाय तसेच राज्य पुरस्कृत कापूस उत्पादकता वाढ व मुल्य साखळी अभियान ह्या विषयावर माहिती दिली. संग्रामसिंग राजपूत यांनी एस.आर.टी. तंत्रज्ञान, नैसर्गिक पद्धतीनुसार करावयाची शेती पध्दत तसेच जीवामृत-बिजामृत तयार करणे आणि महत्त्व विशद केले. त्याचे प्रात्यक्षिक…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यासह परिसरातील तालुक्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पासाठी केंद्राचे दरवाजे खुले झाले आहेत. केंद्र शासनाने १२ मार्च रोजी केंद्रीय जल आयोगाकडून मान्यता दिल्याने धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे आयोगाने दोन हजार ८८८ कोटींच्या पहिल्या टप्प्यास मान्यता देताना त्यात १ हजार ५०० कोटींच्या लिफ्ट इरिगेशन योजनेचा समावेश केला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार आहे. सुमारे २५ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेनंतर पहिल्या टप्प्यासाठी इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स होऊन…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी गेल्या पंधरा वर्षापासून येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. वाचनालयास पंधरा वर्षे उलटून गेल्यावरही शासनाकडून अद्यापपर्यंत कुठलेही अनुदान व निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शासनाने त्याची त्वरित दखल घेऊन अनुदान प्राप्त करून द्यावे, अशी मागणी वाचनालयाचे संस्थापक-अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी केली आहे. गेल्या पंधरा वर्षापासून अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय हे पेन्शनर शिक्षक डी. डी. पाटील स्वखर्चाने चालवित आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन हे आमदार असताना त्यांच्या हस्ते गेल्या २ ऑक्टोबर २०१० रोजी वाचनालयाचे उद्घाटन झाले होते. दरवर्षी शासन मान्य ऑडिटरकडून वाचनालयाचे ऑडिट केले जाते. वाचनालयाचे पॅन कार्डही…
साईमत, फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष मुस्तफा (राजु) बिऱ्हाम तडवी यांच्या नेतृत्वाखाली फैजपूरचे उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी फैजपूर विभाग यांना आसेमं (आदिवासी सेवा मंडळ) आणि आदिवासी तडवी भील समाज बांधवांनी विविध विषयांवर भेट घेऊन निवेदन सादर केले. शासनाचे लक्ष वेधून अडचणी सोडविण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बांधवांना वस्तू, संस्कृती जतन, संवर्धन, प्रदर्शन, चालीरिती रिवाज अविरत अबाधित व संस्कृतीचे संवर्धनासाठी पुणे टीआरटीआय आदिवासी संग्रहालय जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी कांतिकारक बिरसा मुंडा संग्रहालय निर्माण करण्यात यावे, शासकीय जनगणनेत आदिवासींना आदिवासी धर्म कोड लागू करावा, शैक्षणिक नेोंदीमध्ये आदिवासी धर्म कोड देण्यात यावा, सातपुडा…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील शिवाजी नगर स्थित कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होममध्ये अत्यंत कमी रक्त असलेल्या गर्भवती मातेसह बाळाला डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे ‘जीवदान’ मिळाले आहे. कमी रक्तामध्ये महिलेचे ऑपरेशन करणे कठीण होते. मात्र, तरीही स्त्रीरोग तज्ज्ञांनी हे सिझर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यात गोंडस मुलाचा जन्म झाला. गर्भवती महिला शितल परदेशी (रा. वाकडी, ता.जामनेर) कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम येथे गेल्या ९ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दाखल झाली होती. ही महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. त्यांना फक्त ५ ग्रॅम एवढेच रक्त होते. याआधी पहिल्या प्रसुतीमध्ये सीझर ऑपरेशन झालेले होते. यावेळेसही तिला सीझर ऑपरेशनची गरज होती. पण ५ ग्रॅम एवढ्या कमी…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी. चिंचोले यांची वाकोद येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी मुख्याध्यापिकापदी उज्ज्वला देवेंद्र शेळके यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी विद्यालयाची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा टिकवुन ठेवली जाईल. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. त्यांच्या नियुक्तीबद्दल शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड, व्हा.चेअरमन भिमराव शेळके, संस्थेचे सचिव सागरमल जैन, सह सचिव यू.यू.पाटील, कार्यालयीन सचिव दीपक गरुड, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विश्वासराव शेळके, उपाध्यक्ष ए.ए.पटेल यांनी कौतुक केले आहे.