पाळधीला ५६० बांधकाम कामगारांना सुरक्षा संचचे वाटप

0
2

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे ५६० बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये किमतीचे बांधकाम उपयोगी किट आणि गृहोपयोगी संच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच वितरित करण्यात आले. बांधकाम कामगारांना उपयुक्त असे किट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. याबद्दल कामगारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, शिरसोली, वावडदा येथेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ५०० किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रशांत झंवर, गुलाब माळी, दिलीप महाजन, अनिल महाजन, सचिन भोई, बळीराम कोळी, दिनेश कडोसे, गौरव महाजन, अरुण पाटील, योगेश माळी, कर्मा मामा, चंदू इंगळे, दीपक कोळी, जीपीएस मित्र परिवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here