भाजप अल्पसंख्यांक आघाडीवर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी अनिस मणियार

0
16

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर

भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी अनिस मणियार यांची नुकतीच निवड करण्यात आली. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून अनिस मणियार हे भाजपचे कार्यकर्ते आहे. ते यापूर्वी अल्पसंख्यांक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्त होते. आता पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास ठेवून अल्पसंख्यांक आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

त्यांच्या निवडीबद्दल ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खा.उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज, अल्पसंख्यांकाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण, पाचोरा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे, तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, सरचिटणीस वसंत पाटील, अनिल नेरकर, विनोद नेरकर, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष आसीफ मणियार, ग्रामपंचायत सदस्य सादिक मणियार, पत्रकार आमीन पिंजारी यांच्यासह कजगाव परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here