जामनेरातील कमल हॉस्पिटलमध्ये गर्भवती मातेसह बाळाला मिळाले ‘जीवदान’

0
3

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

येथील शिवाजी नगर स्थित कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होममध्ये अत्यंत कमी रक्त असलेल्या गर्भवती मातेसह बाळाला डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे ‘जीवदान’ मिळाले आहे. कमी रक्तामध्ये महिलेचे ऑपरेशन करणे कठीण होते. मात्र, तरीही स्त्रीरोग तज्ज्ञांनी हे सिझर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यात गोंडस मुलाचा जन्म झाला.

गर्भवती महिला शितल परदेशी (रा. वाकडी, ता.जामनेर) कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम येथे गेल्या ९ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दाखल झाली होती. ही महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. त्यांना फक्त ५ ग्रॅम एवढेच रक्त होते. याआधी पहिल्या प्रसुतीमध्ये सीझर ऑपरेशन झालेले होते. यावेळेसही तिला सीझर ऑपरेशनची गरज होती. पण ५ ग्रॅम एवढ्या कमी रक्तामध्ये ऑपरेशन करणे कठीण होते. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.गिरीधारी जेधे यांनी हे सिझर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कमल हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत भोंडे यांनी जामनेर येथील मीरा ब्लड स्टोरेज व जळगाव येथील रेड प्लस रक्त केंद्र येथून त्वरित रक्त उपलब्ध करून दिले. भूलरोग तज्ज्ञ डॉ. दीपक ठाकूर यांनीही एवढ्या कठीण सीझर ऑपरेशनसाठी भूल देण्यास संमती दर्शविली.

९ मार्च रोजी मध्यरात्री हे अत्यंत कठीण सीझर ऑपरेशन कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम येथे पार पडले. ऑपरेशनसाठी संचालक डॉ. प्रशांत भोंडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गिरधारी जेधे, भूलरोग तज्ज्ञ डॉ. दीपक ठाकूर, बालरोग तज्ज्ञ डॉ. निलेश काळे यांच्यासह हॉस्पिटल कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here