साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील बी. पी. आर्टस्, एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेजमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. अजय काटे होते. यावेळी उत्सव समिती प्रमुख प्रा.अंकुश जाधव, प्रा. डॉ. शशिकांत भामरे, एन.एस.एस. प्रमुख प्रा. रवींद्र बोरसे, डॉ. दीपक पाटील डॉ. अर्चना कुलकर्णी, श्रीमती मराठे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अजय काटे यांनी मनोगत व्यक्त करुन यशवंतराव चव्हाण यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी हेमंत गायकवाड, संजय जाधव यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उत्सव समिती प्रमुख प्रा. अंकुश जाधव तर डॉ. दीपक पाटील यांनी आभार मानले.