साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी. चिंचोले यांची वाकोद येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी मुख्याध्यापिकापदी उज्ज्वला देवेंद्र शेळके यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी विद्यालयाची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा टिकवुन ठेवली जाईल. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
त्यांच्या नियुक्तीबद्दल शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड, व्हा.चेअरमन भिमराव शेळके, संस्थेचे सचिव सागरमल जैन, सह सचिव यू.यू.पाटील, कार्यालयीन सचिव दीपक गरुड, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विश्वासराव शेळके, उपाध्यक्ष ए.ए.पटेल यांनी कौतुक केले आहे.