साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सडावण बु.ला जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अमळनेर मतदार संघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी विविध गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थित ग्रामस्थ, मान्यवर, पालकांची मने जिंकली. शाळेतील पहिली ते सातवीपर्यंत मुलांनी एकापेक्षा एक अशा हिंदी, मराठी, अहिराणी, देशभक्तीपर व आदिवासी गीत सादर करून लोकांचे प्रबोधन व मनोरंजन केले. उपस्थित सर्वांनी बालकलाकारांचे कौतुक करून रोख बक्षीस दिले. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मनोगतातून चिमुकल्यांचे कौतुक करत शाळेत मला पूर्ण गाव दिसते, असा गौरव केला. तसेच मुलांना…
Author: Sharad Bhalerao
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथील समस्त माळी समाज पंच मंडळातर्फे लहान माळी वाडा मंगल कार्यालयाची नवीन वास्तु उभारणीच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. त्या अदमासे सात हजार स्केअर फुट बांधकामाचा पहिल्या मजलाचे स्लॅब टाकण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरूवात केले आहे. दोन मजली बांधकामास पार्किंगसह विविध सुविधाजनक परीपूर्ण कामास तीन कोटीपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. अजुनही बरेचसे काम बाकी आहे. पहिला मजल्याच्या स्लॅबचे ज्येष्ठ पत्रकार तथा समाजाचे ज्येष्ठ पंच तसेच माजी कोषाध्यक्ष कडू महाजन यांच्या हस्ते व विविध पदाधिकाऱ्यांसह पूजन करुन कामास सुरुवात करण्यात आली. उर्वरित कामासाठी समाज बांधवानी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन पंच मंडळाच्यावतीने केले आहे. पूर्वी ज्या दानशुर दात्यांनी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपा महायुतीचा बालेकिल्ला आहे. पक्षाने वेळोवेळी ज्याला उमेदवारीची संधी दिली त्याला भरघोस मतांनी जनतेने विजयी केले आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या श्रीमती स्मिता वाघ यांना नेतृत्वाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा सन्मान केला असल्याचे प्रतिपादन आ.मंगेश चव्हाण यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयात आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला ज्येष्ठ नेते वसंतराव चंदात्रे, प्रीतमदास रावलानी, सुरेश सोनवणे, संजय पाटील, के.बी.साळुंखे, प्रेमचंद खिवसरा, सुरेश स्वार, धर्मराज वाघ, राजेंद्र चौधरी, शेषराव पाटील,…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या जळगाव पूर्व जिल्हा चिटणीसपदी नांद्रा प्र.लो.चे कांतीलाल दौलत पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीत गावातील काही नागरिकांनाही पदे देण्यात आली. भाजपाचे संघटन वाढवून पक्षाला बळकट करायचे काम तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या आपल्या नेत्यामार्फत किंवा सरकारच्यावतीने सोडवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम मनापासून करणार असल्याचे मत कांतीलाल पाटील यांनी निवडीवेळी व्यक्त केले. त्यांच्या निवडीबद्दल मंत्री गिरीष महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, किसान मोर्चाचे…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर पाचोरा कृषी विभाग आणि पाचोरा तालुका ड्रीप डीलर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय येथे कृषी अधिकारी कार्यालयामधील कृषी पर्यवेक्षक के. एन. घोंगडे यांची जिल्हा बीज प्रमाणिकरण यंत्रणा, जळगाव येथे कृषी अधिकारी पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली आहेे. याबद्दल त्यांचा सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव साहेब होते. यावेळी तालुका ड्रीप डीलर असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, जळगाव जिल्हा ड्रीप डिलर असोसिएशनचे संचालक अतुल पाटील, कंपनी प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांसह वितरक उपस्थित होते. के. एन. घोंगडे हे स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीविषयक शासकीय योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना योग्यरित्या…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी जळगाव महिला व बाल विकास विभाग, नेहरू युवा केंद्र आणि जळगाव जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाचोरा गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै. परशराम कोंडिबा अर्थात पी. के. शिंदे विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित ‘नारीशक्ती फिटनेस रन’ला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याअंतर्गत महिलांसाठी ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना टीशर्ट व कॅप देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत प्रथम बक्षीस पिंकी जिनोदिया, द्वितीय सविता पाटील तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्रतीक्षा पाटील यांनी पटकावले. स्पर्धेचे आयोजन युवा सामाजिक कार्यकर्ते कमलेश सोनवणे यांनी केले होते. आयोजनासाठी सुवर्णा पाटील आणि मनोज पाटील यांचे सहकार्य लाभले.
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून शहरातील औदुंबर नगरातील अंधारात असलेल्या नागरिकांच्या मदतीला काँग्रेसचे अध्यक्ष धावून आले होते. त्यांनी केलेली मागणी मंजूर झाल्याने वीज महावितरण कंपनीवरचे हल्लाबोल आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले आहे. शहरातील जुन्या सारोळा बुद्रुक रस्त्यावरील औदुंबर नगरातील रहिवाशी गेल्या दीड वर्षांपासून इलेक्ट्रिक पोलसाठी संघर्ष करत होते. येथील रहिवाशांनी अनेक राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. तरीही समस्या सोडविली गेली नाही. त्यातच वीज महावितरण कंपनीने स्थानिक नागरिकांनी इतरांकडून घेतलेला वीज पुरवठा खंडित केल्याने हा परिसर अंधारात आला. अशावेळी स्थानिक रहिवासींनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांना परिसरात बोलावून समस्या त्वरित सोडवा, अशी मागणी केली होती.…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यात २०१२ पासून महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू झाली. मात्र, २०१४ पासून ऑनलाईन प्रणाली सुरू झाल्यावर कामांना वेगाने गती मिळाली. हा वेग फक्त काही काळच राहिला. कारण राजकीय पुढारी व पदाधिकाऱ्यांचा त्यात थेट हस्तक्षेप नसल्याने योजनेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. वेळोवेळी पैसे घेतल्याच्या आरोपाची कारण देत कामात खोडा घालण्याचे काम सुरू झाले. पैसे कुणी घेतले? किती घेतले? कधी घेतले? त्याचा कुठलाही पुरावा मिळत नाही. मात्र, यासाठी बैठका घेतल्या जातात. कामे बंद पाडली जातात. खरोखर जर कोणी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे यात दुमत नाही. मात्र, या गोष्टींसाठी एखाद दुसरा चुकला असेल म्हणून…
साईमत, यावल : प्रतिनिधी ‘कमार’ म्हणजेच लोहार (एस.टी.) जमातीची तस्सम जमात असणाऱ्या लोहार आणि तिच्या उपजमातींना अनुसूचित जमाती (एस.टी.) च्या सवलती त्वरित लागू करण्यात याव्या, अशा आशयाचे लेखी निवेदन समस्त लोहार समाजाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे नुकतेच देण्यात आले. लोहार व तिच्या तत्सम जमाती फारच मागासलेल्या आहे. अत्यंत निकृष्ट व हलाखीचे जीवन जगत आहे. त्यामुळे मध्यप्रांत व वऱ्हाड राज्यांचे १९४१ व १९५८ च्या आदेशानुसार लोहार जमातीला आदिम जमाती (एस.टी.)च्या सवलती लागू केलेल्या होत्या. पुढे विदर्भ प्रदेश १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आला. त्यामध्ये लोहार जमात एस.टी.च्या यादीतून वगळण्यात आले. परंतु यादीमध्ये कमार जमातीचा उल्लेख क्रमांक २० वर केलेला आहे. ‘कमार’ म्हणजेच…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी वनपरिक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे कांतीलाल गुलाब पावरा (रा. खैर कुंडीपाडा) ह्याने वनरक्षक विजय पावरा आणि वनसेवक रवींद्र बारेला, संजय बारेला यांना शिवीगाळ करून तुमचे मुंडके उडवून देईल, अशी धमकी दिल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करत तसेच शिवीगाळ व धक्काबुक्की आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने कांतीलाल गुलाब पावरा याच्याविरुद्ध अडावद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. २०२४ मधील प्रथम वन अपराधातील गुन्ह्यातील जप्त मुद्देमालातील सागाचे ४८ नग वनरक्षक विजय मोत्या पावरा यांनी वनपरीक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे आणून ठेवले होते. त्यावेळी कांतीलाल गुलाब पावरा हा वनपरीक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे येऊन वनरक्षक आणि वनसेवक यांना जंगलातील तोडलेले सागाचे…