सडावण बु.ला जिल्हा परिषदेच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील सडावण बु.ला जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अमळनेर मतदार संघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी विविध गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थित ग्रामस्थ, मान्यवर, पालकांची मने जिंकली. शाळेतील पहिली ते सातवीपर्यंत मुलांनी एकापेक्षा एक अशा हिंदी, मराठी, अहिराणी, देशभक्तीपर व आदिवासी गीत सादर करून लोकांचे प्रबोधन व मनोरंजन केले. उपस्थित सर्वांनी बालकलाकारांचे कौतुक करून रोख बक्षीस दिले.

यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मनोगतातून चिमुकल्यांचे कौतुक करत शाळेत मला पूर्ण गाव दिसते, असा गौरव केला. तसेच मुलांना प्रोत्साहनपर रोख बक्षीस दिले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी कार्यक्रमास उपस्थित देऊन मुलांचे कौतुक करुन मार्गदर्शनपर भाषण केले. कार्यक्रमाला सरपंच राजीव कुमार पाटील, उपसरपंच दिनानाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच गुलाब पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज पाटील, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी कर्मचारी, सर्व बचत गट, आरोग्य कर्मचारी, गावातील तरुण मित्र मंडळ, विविध संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सरला बाविस्कर, राजेश साळुंखे, श्‍यामकांत बागड, मनीषा पाटील, मेघा सोनवणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सुकदेव पाटील, योगेश पाटील, अंकुश बिऱ्हाडे यांच्यासह इतर युवकांनी सहकार्य केले. निळकंठ दादा यांनी साऊंड सिस्टिम व लाईटची व्यवस्था केली. सूत्रसंचालन नितीन शिंदे, सुनील मोरे तर आभार सुनील मोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here