साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
जळगाव महिला व बाल विकास विभाग, नेहरू युवा केंद्र आणि जळगाव जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाचोरा गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै. परशराम कोंडिबा अर्थात पी. के. शिंदे विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित ‘नारीशक्ती फिटनेस रन’ला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याअंतर्गत महिलांसाठी ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना टीशर्ट व कॅप देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत प्रथम बक्षीस पिंकी जिनोदिया, द्वितीय सविता पाटील तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्रतीक्षा पाटील यांनी पटकावले. स्पर्धेचे आयोजन युवा सामाजिक कार्यकर्ते कमलेश सोनवणे यांनी केले होते. आयोजनासाठी सुवर्णा पाटील आणि मनोज पाटील यांचे सहकार्य लाभले.