वनरक्षकाला शिवीगाळ करत शासकीय कामात आणला अडथळा

0
5

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

वनपरिक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे कांतीलाल गुलाब पावरा (रा. खैर कुंडीपाडा) ह्याने वनरक्षक विजय पावरा आणि वनसेवक रवींद्र बारेला, संजय बारेला यांना शिवीगाळ करून तुमचे मुंडके उडवून देईल, अशी धमकी दिल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करत तसेच शिवीगाळ व धक्काबुक्की आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने कांतीलाल गुलाब पावरा याच्याविरुद्ध अडावद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

२०२४ मधील प्रथम वन अपराधातील गुन्ह्यातील जप्त मुद्देमालातील सागाचे ४८ नग वनरक्षक विजय मोत्या पावरा यांनी वनपरीक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे आणून ठेवले होते. त्यावेळी कांतीलाल गुलाब पावरा हा वनपरीक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे येऊन वनरक्षक आणि वनसेवक यांना जंगलातील तोडलेले सागाचे लाकडे उचलून आणण्यावरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. सागाची वृक्षतोड मीच केली होती आणि यापुढेही करेल, असे बोलून तेथून निघून गेला. त्यानंतर बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील आदीमित्र सर्वेक्षणसाठी आलेले विद्यार्थ्यांना वनरक्षक गुन्ह्याच्या सर्वेकामी शासकीय वाहनात बसून सर्वेक्षणासाठी खैर कुंडीपाडा येथे गेले. तेव्हा इसमावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा राग आल्याने शासकीय वाहन, कर्मचारी, विद्यार्थ्यांवर दगडफेक, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. दगडफेकीमुळे शासकीय वाहनाचे नुकसान झाले आहे.

पुढील तपास उपवनसंरक्षक यावल, सहाय्यक वनसंरक्षक चोपडा आणि देवझिरी वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगाव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here