Author: Sharad Bhalerao

साईमत, रावेर : प्रतिनिधी येथील पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यावर त्यांच्याकडून विविध ठिकाणावरुन चोरलेल्या एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमधुन समाधन व्यक्त होत आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील नांदुरपिंप्री येथील लिलाधर पाटील यांच्या मोटरसायकल चोरी प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केल्यावर जळगाव येथून आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे तर वढोदा, ता.यावल येथून आरोपी भरत गणेश सोनवणे यांना ताब्यात घेत चौकशी केल्यावर दोघांकडून ४० हजार किमतीची हिरो होंडा कंपनीची (क्र.एमएच१९ बीके ९४४८) तसेच ३५ हजार किमतीची हिरो होंडा विना नंबर प्लेट तसेच ३० हजार किमतीची प्लेटीना…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर करून जवळपास २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे. तरीही सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गा अंतर्गत (एसइबीसी) मराठा जातीचे दाखले महसूल प्रशासनाच्यावतीने वितरित केले जात नाही. त्यामुळे होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी मराठा जातीचे दाखले अत्यावश्‍यक असताना तरुणांना प्रशासनाच्या पायऱ्या झिजव्या लागत आहे. मराठा तरुणांचे उज्ज्वल भविष्य उद्ध्वस्त होत असल्यामुळे लवकरात लवकर महसूल प्रशासनाच्यावतीने मराठा जातीचे दाखले वितरित करण्याची मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने प्रांताधिकारी प्रमोद हिले यांना मंगळवारी, २ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे केली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण देण्यात आले आहे. यापूर्वी आर्थिक दृष्ट्या…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या निर्देशानुसार पाचोरा येथील श्री. गो.से हायस्कुल येथे पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची नुकतीच निवडणूक घेण्यात आली. निरीक्षक म्हणून पतपेढीचे माजी अध्यक्ष तथा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते संभाजी पाटील, यु.यु.पाटील होते. याप्रसंगी पतपेढीचे माजी संचालक तथा ज्येष्ठ नेते प्रमोद गरुड, माध्यमिक शिक्षक संघाचे विद्यमान अध्यक्ष आर.जी. पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक भावेश अहिरराव उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारिणी निवडीचे सर्वाधिकार प्रमोद गरुड यांना देण्यात आले होते. कार्यकारिणीत अध्यक्षपदी आर.एल.पाटील, उपाध्यक्षपदी पी.सी. पाटील माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी, श्रीमती यु.जी.कदम समाज विकास विद्यालय शिंदाड, चिटणीसपदी संदीप पाटील ग्रामविकास…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होत आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी. यासोबतच प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, यासाठी रविवारी, ३१ मार्च रोजी प्रांताधिकारी प्रमोद हिले येथील हौशी सायकलिस्ट बरोबर मतदान जनजागृती मोहिमेत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रविवारी सकाळी साडेसहा वाजता सायकलफेरीला सुरुवात झाली. नांदगाव रस्त्यावरील खडकी बु. आणि भडगाव रस्त्यावरील ओझर येथे जमलेल्या ग्रामस्थांना प्रांताधिकारी हिले यांनी मतदान करण्याबाबत आवाहन केले. मतदारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी केले. यावेळी मतदान केंद्रांवर उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाळणाघर, दिव्यांग व्यक्तिंसाठी रम्प अशा सुविधा करण्यात येत…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी सातपुड्याच्या पायथ्याशी कोरपावली-दहिगाव रस्त्यावर उत्तर-दक्षिण असलेल्या नाल्याजवळ सातपुडा जंगलात दुर्मिळ असलेले अमूल्य रोहीण जातीच्या लाकडाचा मोठा साठा सोमवारी, १ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका ठिकाणी पडून असल्याने यावल पूर्व व पश्‍चिम वन विभाग वन क्षेत्रपाल हे कार्यालयात बसून कामकाज करीत आहे. त्यामुळे कारवाई होत नसल्याने तसेच बेकायदा काही एक, दोन कर्मचारी चमकोगिरी करून घेत असल्याने यावल, चोपडा, रावेर तालुक्यात सातपुडा जंगलात अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. सविस्तर असे की, सातपुडा डोंगरातून सागवान, खैर लाकडासह रोहीण जातीच्या लाकडाची मोठ्या प्रमाणात सर्रासपणे वाहतूक सुरू आहे आणि या वृक्षाची कत्तल करणारे कोण आहेत? हे वन क्षेत्रपाल…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ संलग्नित जामनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाची त्रैवार्षिक निवडणूक जामनेरातील जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच पार पाडली. अध्यक्षस्थानी शैक्षणिक समन्वयक यु.यु.पाटील होते. यासाठी निरीक्षक म्हणून जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील यांनी काम पाहिले. याप्रसंगी शेंदुर्णीतील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चौधरी, जामनेर तालुका माध्यमिक पतपेढीचे संचालक आबा पाटील, वाकोदच्या राणी दानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यु.यु.पाटील यांची धी शेंदुर्णी सेकंडरी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी सोने-चांदीच्या खरेदीपोटी दिलेला धनादेश बँकेत न वटल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावून फिर्यादीस भरपाई म्हणून २० लाख रुपये देण्याचा आदेश दिला. ही रक्कम विहीत मुदतीत न्यायालयात जमा न केल्यास अधिकची सहा महिन्यांच्या कारावासाचीही शिक्षा सुनावली. सविस्तर असे की, येथील ललित अभय सोनार यांनी शहरातील सोने-चांदीचे व्यापारी मनोज सुभाषचंद जैन यांच्याकडून १७ लाख ५० हजारांच्या सोन्या-चांदीची खरेदी केली होती. त्याबदल्यात ललित सोनार यांनी मनोज जैन यांना धनादेश दिले होते. दिलेल्या तारखेला बँकेत धनादेश वटले गेले नाही. त्यामुळे मनोज जैन यांनी ललित सोनार यांच्या विरोधात येथील न्यायालयात खटला दाखल केला होता. ललित…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत सोळा संस्कारांपैकी विवाह हा महत्वाचा आणि तितकाच पवित्र असा संस्कार आहे. चार आश्रमांपैकी असलेला गृहस्थाश्रम हा महत्त्वाचा आणि सोबतच पती आणि पत्नी यांच्या परस्परांवषयी असलेला त्याग, समर्पण आणि ठाम विश्‍वास याची घट्ट आणि अतूट गुंफण आहे. मात्र, आजच्या काळात वाढलेला चंगळवाद, दिखाऊपणा, पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण यामुळे आदर्श, ध्येये, एकविचार या नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे कौटुंबिक व्यवस्था ढासळत आहे. यासाठी कुटुंबाचे स्थैर्य टिकून राहण्यासाठी नैतिक मूल्यांची जपणूक करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जळगाव कौटुंबिक न्यायालयात वकिली आणि फॅमिली कॉन्सिलिंगसाठी कार्यरत ॲड. भारती वसंत ढाके यांनी केले. रविवारी, ३१ मार्च रोजी मेहरूणमधील संत नरहरी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीचे विविध माध्यमातून कार्यक्रम सुरु आहेत. अशातच एरंडोल येथे रविवारी, ३१ मार्च रोजी सकाळी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. त्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वत: सायकल घेऊन रॅलीत उत्साहात सहभागी झाले होते. त्यामुळे इतरांमध्ये उत्साह निर्माण झाला. एरंडोल तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले पुतळा, नागोबा मढी, मारवाडी गल्ली, भगवा चौक, मेन रोड (बाजार पेठ) मार्गे तहसील कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. तसेच विविध ठिकाणी थांबून…

Read More

साईमत, लोहारा, ता. पाचोरा : वार्ताहर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विस्तृत बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी लोहारा गावातील शेकडो सुशिक्षित तरुण, शेतकरी वर्ग शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा व्यक्त करत अनेक युवक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी जामनेर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी जि.प.सदस्य डिगंबर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख डॉ.मनोहर पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, डॉ.प्रशांत पाटील, किशोर खोडपे, आशिष दामोदर, रुपेश पाटील, प्रल्हाद बोरसे, विश्‍वजीत पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या लोहारा अध्यक्षपदी प्रणेश भागवत क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. लोहारा येथील…

Read More