पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी आर.एल.पाटील

0
1

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या निर्देशानुसार पाचोरा येथील श्री. गो.से हायस्कुल येथे पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची नुकतीच निवडणूक घेण्यात आली. निरीक्षक म्हणून पतपेढीचे माजी अध्यक्ष तथा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते संभाजी पाटील, यु.यु.पाटील होते. याप्रसंगी पतपेढीचे माजी संचालक तथा ज्येष्ठ नेते प्रमोद गरुड, माध्यमिक शिक्षक संघाचे विद्यमान अध्यक्ष आर.जी. पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक भावेश अहिरराव उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारिणी निवडीचे सर्वाधिकार प्रमोद गरुड यांना देण्यात आले होते.

कार्यकारिणीत अध्यक्षपदी आर.एल.पाटील, उपाध्यक्षपदी पी.सी. पाटील माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी, श्रीमती यु.जी.कदम समाज विकास विद्यालय शिंदाड, चिटणीसपदी संदीप पाटील ग्रामविकास विद्यालय पिंपळगाव हरेश्‍वर, संघटक चिटणीसपदी रत्नराज साळुंखे माध्यमिक विद्यालय साजगाव, क्रीडा चिटणीस एस. के.पाटील माध्यमिक विद्यालय खाजोळा, कोषाध्यक्षपदी वीरभूषण सोनवणे महात्मा फुले हायस्कूल भोजे यांची निवड करण्यात आली.

सदस्यांमध्ये ज्योती ठाकरे गो.से. हायस्कूल पाचोरा, सुषमा पाटील पी.के. शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा, मनीषा शिवनारायण जाधव एस. के. पवार माध्यमिक विद्यालय नगरदेवळा, यशवंत गांगुर्डे माध्यमिक विद्यालय सामनेर, योगेश ठाकूर एस.के.पवार हायस्कुल नगरदेवळा, रेहान खान उर्दू हायस्कूल पाचोरा, प्रमोद मधुकरराव गरुड माध्यमिक विद्यालय खडकदेवळा, रवींद्र गंभीरराव पाटील तावरे कन्या विद्यालय पाचोरा, मनोहर नानाभाऊ देसले गो.से. हायस्कुल पाचोरा या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणीचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल तालुक्यातील विविध शाळांसह संघटनांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here