जामनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी सत्यवान चौधरी

0
3

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ संलग्नित जामनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाची त्रैवार्षिक निवडणूक जामनेरातील जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच पार पाडली. अध्यक्षस्थानी शैक्षणिक समन्वयक यु.यु.पाटील होते. यासाठी निरीक्षक म्हणून जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील यांनी काम पाहिले. याप्रसंगी शेंदुर्णीतील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चौधरी, जामनेर तालुका माध्यमिक पतपेढीचे संचालक आबा पाटील, वाकोदच्या राणी दानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांसह अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यु.यु.पाटील यांची धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लि,. शेंदुर्णीच्या सह सचिवपदी निवडीबद्दल माध्यमिक शिक्षक संघातर्फे संभाजी पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी निरीक्षक संभाजी पाटील, यु.यु.पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तथा सुत्रसंचलन आर.एस.चौधरी यांनी केले.

माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी अशी

जामनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी सत्यवान यशवंत चौधरी (अ.भा.ख.गरुड माध्यमिक विद्यालय, वाकडी), उपाध्यक्षपदी सालूसिंग गिमल्या शेवाळे (न्यू इंग्लिश स्कुल, जामनेर), उपाध्यक्षा अश्‍विनी शिवाजीराव पाटील (अ.भा.ख.गरुड माध्यमिक विद्यालय, वाकडी), चिटणीस विहार विलास पाटील (का.आ.वि. तोरणाळे), संघटक चिटणिस प्रशांत रमेश वाघ (जनता हायस्कुल, नेरी), सह संघटक चिटणीस दीपक आत्माराम माळी (न्यू इंग्लिश स्कुल, फत्तेपूर), क्रीडा चिटणीस तुषार साहेबराव पाटील (अ.चि.पा.मा.विद्यालय, रोटवद), कोषाध्यक्षपदी हरिभाऊ भानुदास राऊत (सावित्रीबाई माध्यमिक विद्यालय, पहुर), सदस्यांमध्ये नंदकुमार अर्जुन पाटील (आर.टी.लेले हायस्कुल, पहुर), डी.एच.चौधरी (राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक विद्यालय, शेंदुर्णी), विजय रामचंद्र सैतवाल (न्यु इंग्लिश स्कुल, मालदाभाडी), शरीफ खान अब्दुल खान (ऊर्दू हायस्कुल, शेंदुर्णी), विजय तानाजी पाटील (राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद), दिलीप दामोदर सोनवणे (रा.अ.महाजन माध्यमिक विद्यालय, हिवरखेडा), ए.आर.तडवी (न्यु इंग्लिश स्कुल, बेटावद) यांचा समावेश आहे. सर्व नवनियुक्त कार्यकारिणीचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शेवटी आबा पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here