कोरपावली-दहिगाव रस्त्यावर दुर्मिळ रोहीण जातीचा लाकडाचा साठा

0
3

साईमत, यावल : प्रतिनिधी

सातपुड्याच्या पायथ्याशी कोरपावली-दहिगाव रस्त्यावर उत्तर-दक्षिण असलेल्या नाल्याजवळ सातपुडा जंगलात दुर्मिळ असलेले अमूल्य रोहीण जातीच्या लाकडाचा मोठा साठा सोमवारी, १ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका ठिकाणी पडून असल्याने यावल पूर्व व पश्‍चिम वन विभाग वन क्षेत्रपाल हे कार्यालयात बसून कामकाज करीत आहे. त्यामुळे कारवाई होत नसल्याने तसेच बेकायदा काही एक, दोन कर्मचारी चमकोगिरी करून घेत असल्याने यावल, चोपडा, रावेर तालुक्यात सातपुडा जंगलात अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

सविस्तर असे की, सातपुडा डोंगरातून सागवान, खैर लाकडासह रोहीण जातीच्या लाकडाची मोठ्या प्रमाणात सर्रासपणे वाहतूक सुरू आहे आणि या वृक्षाची कत्तल करणारे कोण आहेत? हे वन क्षेत्रपाल यांना चांगल्या प्रकारे माहित असताना कारवाई होत नाही. कारवाई झाली तरी आरोपी फरार झाल्याचे कारण सांगितले जाते. यावल पूर्व व पश्‍चिम वनक्षेत्रपाल हे आपल्या कार्यालयात बसून कामकाज करीत असले तरी त्यांचे काही एक-दोन कर्मचारी एक ते दोन तर बेकायदा कर्मचारी आहेत. ते आपल्या सोयीनुसार प्रसिद्धी माध्यमांना वेगळीच माहिती देऊन प्रसिद्धी करून घेत आहे. सागवान खैर, रोहीण, लाकडाच्या तस्करी व अतिक्रमणाबाबत मात्र ते आपले तोंड बंद ठेवत आहे.

तालुक्यात ठिकठिकाणी लाकूड व्यावसायिक सर्रासपणे जुन्या सागवानी लाकडाच्या पासेसच्या नावाखाली नवीन सागवानी लाकडाचे साहित्य बिनधास्त खुलेआम सर्रासपणे विक्री करीत आहे. सातपुडा जंगलात दुर्मिळ असे रोहीण जातीचे वृक्ष यांना फार मोठे महत्त्व आहे. या वृक्षाच्या सालीपासून तयार होणारी गावठी दारू कडक लोकप्रिय आहे. त्यामुळे दारू तयार करण्यासाठी रोहीण जातीच्या वृक्षाची साल मोठ्या प्रमाणात वापरली जाते. लाकडाचा वापर लाटणे बनविण्यासाठी केला जातो हे उद्योग सर्रासपणे सुरू आहेत. यावल पूर्व व पश्‍चिम वनक्षेत्रपाल हे आपल्या कामकाजाबाबत जनतेच्या माहितीसाठी माहिती एकाच वेळेला सर्व प्रसिद्धी माध्यमांना देत नसल्याने त्यांच्या वाहनांचे चालक आणि काही कर्मचारी फक्त आपल्या सोयीनुसार चमकोगिरी करीत असल्याचेही उघड झाले आहे.

याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर, वनसंरक्षक धुळे यांच्याकडे उपवनसंरक्षक आणि सहाय्यक वन संरक्षक तसेच यावल पूर्व व पश्‍चिम वन विभागाचे वनक्षेत्रपाल यांच्याबाबत रीतसर तक्रार केली जाणार आहे. कारण कोरपावली-दहीगाव रस्त्यावर लाखो रुपयांचे बेवारस लाकूड पडून असताना वन विभागाला साधी खबर किंवा दिसून येत नसल्याने याबाबत लाकूड व्यावसायिकांचे आणि वनक्षेत्रपालांसह काही वन कर्मचाऱ्यांचे हितसंबंध असल्याचेही चर्चिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here