साईमत, रावेर : प्रतिनिधी
येथील पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यावर त्यांच्याकडून विविध ठिकाणावरुन चोरलेल्या एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमधुन समाधन व्यक्त होत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील नांदुरपिंप्री येथील लिलाधर पाटील यांच्या मोटरसायकल चोरी प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केल्यावर जळगाव येथून आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे तर वढोदा, ता.यावल येथून आरोपी भरत गणेश सोनवणे यांना ताब्यात घेत चौकशी केल्यावर दोघांकडून ४० हजार किमतीची हिरो होंडा कंपनीची (क्र.एमएच१९ बीके ९४४८) तसेच ३५ हजार किमतीची हिरो होंडा विना नंबर प्लेट तसेच ३० हजार किमतीची प्लेटीना (क्र.एमएच १९ डीओ ८७३८) तसेच ३५ हजार किमतीची स्टार सिटी (एमपी १२ एमसी २५७०) अशा चार मोटर सायकली ताब्यात घेण्यात आल्या आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक ईश्वर चव्हाण, सुरेश मेढे, पो.कॉ.समाधान ठाकुर, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, अमोल जाधव, महेश मोगरे, विकार शेख, सुकेश तडवी यांच्या पथकाने केली आहे.