चाळीसगावला प्रांताधिकाऱ्यांची सायकलफेरीद्वारे मतदान जनजागृती

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होत आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी. यासोबतच प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, यासाठी रविवारी, ३१ मार्च रोजी प्रांताधिकारी प्रमोद हिले येथील हौशी सायकलिस्ट बरोबर मतदान जनजागृती मोहिमेत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रविवारी सकाळी साडेसहा वाजता सायकलफेरीला सुरुवात झाली.

नांदगाव रस्त्यावरील खडकी बु. आणि भडगाव रस्त्यावरील ओझर येथे जमलेल्या ग्रामस्थांना प्रांताधिकारी हिले यांनी मतदान करण्याबाबत आवाहन केले. मतदारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी केले.

यावेळी मतदान केंद्रांवर उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाळणाघर, दिव्यांग व्यक्तिंसाठी रम्प अशा सुविधा करण्यात येत आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते प्रत्येकाने बजावलेच पाहिजे. गेल्या निवडणुकीत केवळ ५८ टक्के मतदान झाले होते. लोकशाहीच्या दृष्टीने ते अयोग्य आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलेच पाहिजे, असे आवाहनही प्रांताधिकाऱ्यांनी केले. स्वतः प्रांताधिकारी सायकलवर येऊन मतदानाची माहिती देत आहे. याबद्दल ग्रामस्थांनी कुतूहल व्यक्त केले. यशस्वीतेसाठी तहसीलदार प्रशांत पाटील, निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ, सायकलगु्रपचे अध्यक्ष दीपक देशमुख, धनंजय मांडोळे, मनिष शेलार यांनी सहकार्य केले. २० कि.मी.ची सायकलफेरी पार पडली.

या हौशी सायकलिस्टने घेतला सहभाग

मतदान जनजागृती सायकलफेरीत प्रांताधिकारी प्रमोद हिले, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांच्यासोबत हौशी सायकलिस्ट रवींद्र पाटील, जिजाबराव वाघ, टोनी पंजाबी, ॲड. भूषण एडके, सुरेश मंधानी, सोपान चौधरी, योगेश पवार, राजेंद्र वाणी, सोनू महाजन, शांताराम पाटील, हर्षल पाटील, सुजित राजपूत आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here