साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील महालखेडा येथील अनैतिक संबंधातून झालेल्या महिलेच्या खून प्रकरणी संजय सुधाकर पाटील ह्या अटक केलेल्या संशयिताला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील महालखेडा येथील शेत शिवारातील डाबर नाल्याजवळ ५ एप्रिल रोजी सायंकाळी गावातीलच ३५ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे तत्काळ फिरवत याप्रकरणी येथीलच संजय सुधाकर पाटील या संशयित आरोपीतास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व त्यांच्या पथकाने तपास करत त्याच रात्री अटक केली होती. विशेष म्हणजे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता यंत्रणा राबविण्यासाठी फॉरेन्सिक टीम बोलविण्यात आलेली होती. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक…
Author: Sharad Bhalerao
साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगोणा येथील २ कोटी ५७ लाख १३ हजार ११ रुपये किमतीची जलजीवन मिशन योजनेचे काम करण्याचा कालावधी पूर्ण झाल्यावरही योजनेचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच यावल येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता ठेकेदारावर काय कारवाई करणार किंवा कारवाई केली आहे किंवा कसे? याबाबत हिंगोणा येथील ग्रामस्थ कोट्यवधी रुपयाच्या योजनेबाबत संशय व्यक्त करीत आहेत. सविस्तर असे की, जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी ग.शि.भोगावडे यांनी गेल्या २० जानेवारी २०२३ रोजी पाचोरा येथील दत्ता वामन पाटील यांना दिलेल्या कार्यारंभ आदेश प्रत्यक्ष बघितल्यावर हिंगोणा, ता.यावल येथील जलजीवन…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे ९ एप्रिल ते १६ एप्रिल २०२४ दरम्यान ‘पारेश्वर महादेव मंदिर’ अखंड हरिनाम किर्तन सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केले आहे. ९ एप्रिल रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली, सिध्देश्वर आश्रम, बेलदारवाडी, १०ला ह.भ.प.वैष्णवी महाराज, न्यायडोंगरी, ११ ला ह.भ.प.भाईदास महाराज, देवगाव, १२ ला ह.भ.प.धनंजय महाराज, ब्राम्हणशेवगे, १३ ला ह.भ.प.विनय महाराज, हिरापूर, १४ ला ह.भ.प.राजेंद्र महाराज, वाघळी, १५ ला दीपिका महाराज, देवळी यांचे रात्री ९ ते ११ वाजे दरम्यान जाहीर किर्तनाचे आयोजन केले आहे. तसेच १६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प.किशोर महाराज, सोनखेडी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी लोकांचा विश्वास मोदींवर आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांवर आहे. त्यांच्या विकसित भारताच्या संकल्पावर आहे. गेल्या १० वर्षात रेल्वे, हायवे, सिंचन सुविधा यात झालेला आमुलाग्र बदल जनतेसमोर आहे. तसेच जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासून भाजपा व मोदींवर प्रेम करणारा असल्याने येथील सर्व स्तरावरील मतदार हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार ४०० पारचा नारा’ सार्थ ठरवतील, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांनी केले. ते चाळीसगाव येथे भाजपा-शिवसेना, राष्ट्रवादी-रिपाई-रासप-रयत क्रांती महायुतीच्या आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते. भर दुपारच्या वेळी घेण्यात आलेल्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा एकत्रित असा हा पहिलाच मेळावा चाळीसगाव…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील जी.एस. विद्यालयाच्या प्रांगणात जळगाव नेहरू युवा केंद्र आणि अमळनेर जनसहयोग फाउंडेशनतर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. कबड्डी व १०० मीटर धावणे प्रकारात स्पर्धा झाल्या. कबड्डीत जी.एस.क्रीडा प्रबोधनी तर १०० मीटर धावणे स्पर्धेत तन्वी राजेंद्र पवार प्रथम आली. स्पर्धेचे उद्घाटन जी.एस. विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती सायली बडगुजर, ए.डी. भदाणे, एस. आर. शिंगणे आदी उपस्थित होते. दोन्ही स्पर्धामध्ये जवळपास ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. कबड्डीत प्रथम जी.एस.क्रीडा प्रबोधनी, उपविजयी शांती निकेतन विद्यालय तर तृतीय ग.स.कबड्डी संघ विजयी ठरले. १०० मीटर धावणे स्पर्र्धेेत तन्वी राजेंद्र…
साईमत, यावल : सुरेश पाटील रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमानन खा.रक्षा खडसे यांच्या विरोधात कोणत्या राजकीय पक्षाकडून कोणता तुल्यबळ असा उमेदवार रिंगणात राहणार किंवा ठरणार? याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीतर्फे रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द होणार का? आणि तरुण तडफदार असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी मिळणार आहे किंवा नाही? आणि अमोल जावळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत का? आणि त्यांनी राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षात प्रवेश न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुल्यबळ असा कोणता उमेदवार खडसे…
साईमत, यावल : प्रतिनिधी महसूल विभागाच्या नियमाची पायमल्ली व दिशाभूल करून जिवंत वृक्षाची तोड करून वन विभागाचे समन्वयामुळे जळाऊ लाकडाची बेकायदा वाहतूक करून व इतर आवश्यक वस्तूचे उद्योग धंद्यासाठी सातपुडा वन विभागात बेकायदेशीर सब डीएफओ, फिरस्ती पथक, नाकेदार यांच्या नावाने २ लाख रुपयांचा वार्षिक करार कोणीतरी केला असल्याने शेती शिवारातील बेकायदा वृक्षतोड करून बेकायदा वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याने लाकूड व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असल्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. शेती शिवारात मोठमोठे जिवंत वृक्षतोड करून अत्याधुनिक मशिनरीने कटाई करून बेकायदा वाहतूक वन विभागाच्या नाक्यावरून सर्रासपणे सुरू आहे. जिवंत वृक्षतोडचे नियम काय आहेत? जिवंत वृक्षतोड संबंधितांना करता येते का?…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असतो. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालयाचा दर्जा ठरत असल्याचे प्रतिपादन जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ. एस.टी. इंगळे यांनी केले. भुसावळ येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक होते. व्यासपीठावर सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, ज्येष्ठ संचालक प्रभाकर पाटील, निळकंठ भारंबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, डॉ. ए.डी. गोस्वामी, समिती प्रमुख डॉ. एस.टी. धूम, अधिसभा सदस्य प्रा. एकनाथ नेहेते, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय.एम.पाटील, पर्यवेक्षक प्रा. स्वाती…
साईमत, रावेर : प्रतिनिधी शहरात बेशिस्त वाहतूक तसेच कुठेही होत असलेली पार्किंग नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील रस्त्यावरुन ये-जा करतांना महिला व नागरिकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा जटील समस्याकडे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, छोरीया मार्केट गेट नजिक, बुरहानपूर जिलेबी सेंटर जवळ महालक्ष्मी मंदिर नजिक रिक्षा चालक स्वत:ची रिक्षा रस्त्यावर लावत आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच सामान खरेदी करण्यासाठी आलेले लोक त्यांची खासगी वाहने रस्त्यावर लाऊन सामान खरेदीसाठी निघुन जात असल्याने दैनंदिन…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील महालखेडा शिवारात ३५ वर्षीय महिलेला अनैतिक संबंधातून शुक्रवारी, ५ एप्रिल रोजी यमसदनी धाडून तिचा खून केला आहे. महिलेच्या डोक्यात दगड टाकून, शरीरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करत तिचा खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. मालताबाई मनोज खाडे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान, मयत महिलेच्या अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संजय सुधाकर पाटील (रा. महालखेडा, ता. मुक्ताईनगर) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला रविवारी, ७ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे निरीक्षक मोहिते यांनी सांगितले. सविस्तर असे की, मालताबाई सकाळी शेतात गेली होती. शुक्रवारी, ५ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सहा…