साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे ९ एप्रिल ते १६ एप्रिल २०२४ दरम्यान ‘पारेश्वर महादेव मंदिर’ अखंड हरिनाम किर्तन सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केले आहे.
९ एप्रिल रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली, सिध्देश्वर आश्रम, बेलदारवाडी, १०ला ह.भ.प.वैष्णवी महाराज, न्यायडोंगरी, ११ ला ह.भ.प.भाईदास महाराज, देवगाव, १२ ला ह.भ.प.धनंजय महाराज, ब्राम्हणशेवगे, १३ ला ह.भ.प.विनय महाराज, हिरापूर, १४ ला ह.भ.प.राजेंद्र महाराज, वाघळी, १५ ला दीपिका महाराज, देवळी यांचे रात्री ९ ते ११ वाजे दरम्यान जाहीर किर्तनाचे आयोजन केले आहे. तसेच १६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प.किशोर महाराज, सोनखेडी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
तसेच १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३ वाजता पालखीचे आयोजन केले आहे. १६ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान कै.ह.भ.प.अशोक मोतीराम पवार यांच्या स्मरणार्थ महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दैनंदिन कार्यक्रमात पहाटे गावातून प्रभातफेरी, पहाटे काकड आरती, सकाळी ८.३० ते ११.३० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ४ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ होईल. धार्मिक किर्तन श्रवण आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, ब्राम्हणशेवगेतर्फे केले आहे.