अमळनेरला नेहरू युवा केंद्रातर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

0
34

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील जी.एस. विद्यालयाच्या प्रांगणात जळगाव नेहरू युवा केंद्र आणि अमळनेर जनसहयोग फाउंडेशनतर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. कबड्डी व १०० मीटर धावणे प्रकारात स्पर्धा झाल्या. कबड्डीत जी.एस.क्रीडा प्रबोधनी तर १०० मीटर धावणे स्पर्धेत तन्वी राजेंद्र पवार प्रथम आली. स्पर्धेचे उद्घाटन जी.एस. विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती सायली बडगुजर, ए.डी. भदाणे, एस. आर. शिंगणे आदी उपस्थित होते. दोन्ही स्पर्धामध्ये जवळपास ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

कबड्डीत प्रथम जी.एस.क्रीडा प्रबोधनी, उपविजयी शांती निकेतन विद्यालय तर तृतीय ग.स.कबड्डी संघ विजयी ठरले. १०० मीटर धावणे स्पर्र्धेेत तन्वी राजेंद्र पवार प्रथम, रूपाली संदीप कोळी द्वितीय, शितल गोकुळ सैंदाणे तृतीय, सेजल प्रदीप ठाकूर चतुर्थ क्रमांक पटकावला. कबड्डीत आश्रमशाळा निंभोरा, जय क्रीडा मंडळ, ग. स. विद्यालय या संघांचा सहभाग होता. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. ह्या स्पर्धा नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तर जनसहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन नेरकर आणि तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here