साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील महालखेडा येथील अनैतिक संबंधातून झालेल्या महिलेच्या खून प्रकरणी संजय सुधाकर पाटील ह्या अटक केलेल्या संशयिताला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील महालखेडा येथील शेत शिवारातील डाबर नाल्याजवळ ५ एप्रिल रोजी सायंकाळी गावातीलच ३५ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे तत्काळ फिरवत याप्रकरणी येथीलच संजय सुधाकर पाटील या संशयित आरोपीतास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व त्यांच्या पथकाने तपास करत त्याच रात्री अटक केली होती. विशेष म्हणजे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता यंत्रणा राबविण्यासाठी फॉरेन्सिक टीम बोलविण्यात आलेली होती.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहु, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर, पो.उपनिरीक्षक संदीप चेढे, चालक पो.हे.कॉ. लतिफ तडवी, पो.ना. प्रदीप इंगळे, मोतीलाल बोरसे, संदीप वानखेडे, पो.अं. सागर सावे, राहुल नावकर, गोपिचंद सोनवणे, अनिल देवरे, राहुल बेहेणवाल, अभिमान पाटील यांनी केली आहे.