साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथून जवळील खडकदेवळा येथे रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांसाठी डॉ.वाय.पी. युवा फाउंडेशन आणि साईनाथ सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने खडकदेवळा खु. येथील मशिदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. इफ्तार पार्टीतून जातीय सलोख्याचे दर्शन घडून आले. अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, बाबू मामू खाटीक, अनिस मामु खाटीक, आरिफ शेख, शकील खाटीक होते. प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना हाफिज जाकीर, इस्माईल शेख, खडकदेवळा खु.चे सरपंच सुदाम वाघ, उपसरपंच नामदेव दाभाडे, पोलीस पाटील तुकाराम तेली, खडकदेवळा बु.चे सरपंच अनिल देवरे, पोलीस पाटील एकनाथ कोळी, युवा नेते बापू पाटील, डॉ. राजू तेली, युनूस तडवी, वाचनालयाचे विश्वास पाटील, संजय निकम,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शाळेतील मुलांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने जलमित्र परिवार चाळीसगावतर्फे २०२० पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी हरित चाळीसगाव चषक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. वृक्षसंवर्धनासाठी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा छान प्रतिसाद मिळत आहे. मुलांना शाळेत असतानाच स्थानिक झाडांची माहिती व्हावी, झाडांचे फायदे समजावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धकांच्या झाडाची सर्वांगीण वाढ विचारात घेऊन त्यांना बक्षीस दिले जाते. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांनी जगविलेल्या झाडांची वाढलेली संख्या बघता झाडांचे संवर्धन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच लावलेली झाडे जगविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शाळांचाही विशेष सन्मानचिन्ह…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी यांची ‘इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन’ विषयाच्या अभ्यास मंडळावर अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल.चौधरी, एन. एस. कोल्हे, एस. पी. पाटील, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, समन्वयक पी. एस. पाडवी, डॉ. पी. एम. रावतोळे, संदीप बी.पाटील आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. ए. एल.चौधरी यांनी सिंगापूर व जपान येथे अभ्यास…
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथील नुरानी मशिदचे इमाम मौलाना शेख सफार यांची कन्या कश्पीया शेख सफार. तिचे वय अवघे पाच वर्षाचे… तरी तिने रोज सकाळी उठून ५ वाजेपर्यंत सहेरी करत भक्तीभावाने नमाज अदा करून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत तिने ना अन्न मागितले, ना पाणी. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ तिने निर्जली २९ रोजे ठेवले. सूर्यास्तानंतर इफ्तारनंतर नमाज अदा केली. इतक्या छोट्या वयात कश्पीया हिने ठेवलेल्या संपूर्ण रमजान महिन्यांच्या रोजाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. आज एकोणतीस (रोजे) उपवास पूर्ण झाले आहेत. यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रणरणत्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता जवळपास १३ ते…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह मंदिरात मंगळवारी, ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त ५१ फुटाची ‘महामंगल गुढी’ उभारण्यात आली होती. यावर्षी शहरातील सचिन ड्रेसेसचे संचालक प्रवीण मोरे यांनी सपत्नीक विधीवत गुढीचे पूजन केले. याप्रसंगी मंगल वाद्यासह शंखनाद व श्रीराम नामाचा जयघोष केला. त्यानंतर मंदिर परिसरात दत्त भगवान व अनघा माता यांच्या मंदिराजवळ चौथऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजनाचे जळगावातील भाविक किशोर बोंडे सपत्नीक मानकरी होते. तसेच स्वच्छतागृहाचेही भूमिपूजन करण्यात आले. शेगाव येथील भाविक विद्याधर महादेव बारद्धे, सदाशिव शामराव बारद्धे, छत्रपती संभाजी नगरातील भाविक सत्यजित वसंतराव देशमुख, शिरपूर येथील भाविक हिरालाल गोविंद चौधरी यांनी भूमिपूजन केले. मंदिराचे पुरोहित जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राज्य सरकारने चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला असताना तालुक्यात महावितरणच्यावतीने वीज बिले सक्तीने वसुली करण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे तात्काळ वीज बिले वसुली बंद करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना १२ तास दिवसभर वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी रयत सेनेच्यावतीने चाळीसगावचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या सूचनेनुसार दुष्काळाच्या परिस्थितीत चाळीसगाव तालुक्यात कुठलीही वीज बिले वसुली सक्तीने करता येत नाही, असे असताना महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा वीज पुरवठा खंडित करून महावितरण कंपनीकडून मनमानी पद्धतीने वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर वीज भरणा करण्यासाठी त्रास दिला जात आहे. तो तात्काळ थांबवून वीज पुरवठा…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सुनसगाव बु. येथील गट नं. ८ चे मालक गोपाल पाटील यांच्या शेतात तीन वर्षाचा बिबट्या नर जातीचा वाघ असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत असल्याची माहिती येथील माजी सरपंच दत्ता साबळे आणि पो. पा. समाधान महाजन, बंडू पाटील, अनिल पाटील यांच्या कानावर आली होती. त्यानंतर ते सर्व जण बिबट्या असलेल्या शेतात गेले. त्यांना तेथे अर्धमेल्या अवस्थेत बिबट्या आढळून आला. दत्ता साबळे यांनी लागलीच वनरक्षक अशोक ठोंबरे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्व कर्मचारी जागेवर पोहोचले. बिबट्या आजारी असल्याने त्यांच्या समोरच त्याच्यावर उपचार करण्याच्या अगोदरच तो मरण पावल्याचे वनविभागाचे नाकेदार अशोक ठोंबरे यांनी सांगितले. नंतर त्याचे…
साईमत, रावेर : प्रतिनिधी तालुक्याला सहा महिन्यानंतर रेशनद्वारे वितरीत होणारी साखर प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा गुढीपाडवा सण गोड होणार आहे.साखर प्राप्त झाल्याची माहिती मिळताच गरजू जनतेतून आनंद व्यक्त होत आहे. मागीलवर्षी ऑक्टोबरपासून अंत्योदय रेशनकार्ड धारकांना साखर मिळाली नव्हती. त्यामुळे गरजू कुटुंबाच्या ताटातून गोडवा रुसला होता. वरिष्ठ स्तरावरुन साखर प्राप्त होत नसल्याने तालुकास्तरावर साखर मिळत नव्हती. अखेर तहसीलदार बंडू कापसे व पुरवठा निरीक्षक डी.के.पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नामुळे आता तीन महिन्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची साखर रावेर गोडाऊनवर प्राप्त झाली आहे. अजुन यावर्षीची जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची साखर यायची बाकी आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या साखरेमुळे गरजू जनतेच्या कुटुंबात…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राज्यात १ एप्रिलपासून नवीन वीज दरवाढ लागू करण्यासाठी महावितरण कंपनीला शासनाने परवानगी दिल्याने सर्व सामान्य जनतेला वीज दरवाढ परवडणारी नसल्याने राज्य सरकारने महावितरण कंपनीने केलेली दरवाढ तात्काळ मागे घेण्याचे आदेश करावेत, यासाठी चाळीसगावचे कार्यकारी अभियंता यांना रयत सेनेच्यावतीने दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मागणीची दखल घेतली नाही तर कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर वीज ग्राहकांसह रयत सेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात १ एप्रिलपासून नवीन वीज दरवाढ लागू झाल्यास महावितरण कंपनीमार्फत वीज ग्राहकांना स्थिर आकार वाढविण्यात येणार आहे. त्यातच इंधन अधिभार जोडल्यावर १० टक्के दरवाढ होणार आहे. घरगुती संवर्गातील सिंगल फेजसाठी पूर्वी ११६ रुपये लागायचे…
साईमत, रावेर : प्रतिनिधी इन्शुरन्स क्लेमचा लाभ मिळविण्यासाठी निंबोल येथील एका इसमाने चोरीचा बनाव करून रावेर पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद दिली होती. यासंदर्भात पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवित फिर्याद दिलेल्या आरोपी व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेत चोरीस गेलेल्या ४ लाख चाळीस हजाराचे व्हेपर्स मशिनरी जप्त केले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे नागरिकांमधुन कौतुक होत आहे. सविस्तर असे की, रावेर तालुक्यातील निंबोल येथील निरज सुनील पाटील यांचे नांदुरखेडा शिवारात ‘श्रीकृष्ण केला व्हेपर्स’ ही फॅक्टरी आहे. ३ रोजी निरज पाटील यांच्या फॅक्टरीतून विविध मशिनरी चोरीस गेल्या होत्या. रावेर पोलिसांनी यासंदर्भात तपासाचे चक्र फिरवायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी आरोपी निरज पाटील (वय २४, रा.…