इन्शुरन्सचा लोभ भोवला; व्हेपर्स फॅक्टरीचा मालकासह तिघे ताब्यात

0
2

साईमत, रावेर : प्रतिनिधी

इन्शुरन्स क्लेमचा लाभ मिळविण्यासाठी निंबोल येथील एका इसमाने चोरीचा बनाव करून रावेर पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद दिली होती. यासंदर्भात पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवित फिर्याद दिलेल्या आरोपी व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेत चोरीस गेलेल्या ४ लाख चाळीस हजाराचे व्हेपर्स मशिनरी जप्त केले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे नागरिकांमधुन कौतुक होत आहे.

सविस्तर असे की, रावेर तालुक्यातील निंबोल येथील निरज सुनील पाटील यांचे नांदुरखेडा शिवारात ‘श्रीकृष्ण केला व्हेपर्स’ ही फॅक्टरी आहे. ३ रोजी निरज पाटील यांच्या फॅक्टरीतून विविध मशिनरी चोरीस गेल्या होत्या. रावेर पोलिसांनी यासंदर्भात तपासाचे चक्र फिरवायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी आरोपी निरज पाटील (वय २४, रा. निंबोल), उमेश सुतार (वय २४), कौशल जंजाळकर, (वय १९, दोघे रा. मेहतर कॉलनी, रावेर) येथून ताब्यात घेत त्यांची विश्‍वासात घेऊन विचारपुस केली. तेव्हा त्यांनी मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे. याबाबत तिघांना अटक केली आहे. चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरिक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्‍याम तांबे, पो.कॉ.सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, राहुल परदेशी, अमोल जाधव, विकार शेख, समाधान ठाकुर यांनी केली. गुन्हाचा तपास करून आरोपी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी केल्या व्हेपर्स मशिनरी जप्त

चोरीचा बनाव करणाऱ्या तिन्ही आरोपींकडून ४५ हजार रुपये किमतीची बनाना वेफर्स मशीन, ४५ हजार रुपये किमतीची पोटॅटो वेफर्स मशीन, ३५ हजार रुपये किमतीचा पोटॅटो पीलर मशीन, ४८ हजार रुपये किमतीचा ड्रायर मशीन, १५ हजार रुपये किमतीचा पॅकींग मशीन, १७ हजार रुपये किमतीचा एक ब्लोवर मशीन, १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा कोटिंग पॅन मशीन, ९० हजार रुपये किमतीच्या पॅकींग मशीन असा चार लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here