सुनसगावकऱ्यांसह वनविभाग कर्मचाऱ्यांनी केले बिबट्यावर अंत्यसंस्कार

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील सुनसगाव बु. येथील गट नं. ८ चे मालक गोपाल पाटील यांच्या शेतात तीन वर्षाचा बिबट्या नर जातीचा वाघ असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत असल्याची माहिती येथील माजी सरपंच दत्ता साबळे आणि पो. पा. समाधान महाजन, बंडू पाटील, अनिल पाटील यांच्या कानावर आली होती. त्यानंतर ते सर्व जण बिबट्या असलेल्या शेतात गेले. त्यांना तेथे अर्धमेल्या अवस्थेत बिबट्या आढळून आला. दत्ता साबळे यांनी लागलीच वनरक्षक अशोक ठोंबरे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्व कर्मचारी जागेवर पोहोचले. बिबट्या आजारी असल्याने त्यांच्या समोरच त्याच्यावर उपचार करण्याच्या अगोदरच तो मरण पावल्याचे वनविभागाचे नाकेदार अशोक ठोंबरे यांनी सांगितले. नंतर त्याचे जागेवरच पशुधन अधिकारी यांनी शवविच्छेदन करून त्याच्यावर ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी उमेश बिराजदार (सहाय्यक वनरक्षक), अमोल पंडित (वनपरिक्षेत्र अधिकारी), वनपाल प्रशांत पाटील, प्रसाद भारूडे, वनरक्षक अशोक ठोंबरे, संदीप चौधरी, गणेश खंडारे, सुनील चिंचोले, डॉ. योगेश किंगे (पशुधन अधिकारी), डॉ. भारती कुडील (पशुधन अधिकारी), मंगेश टाक (पशुधन अधिकारी), जीवन पाटील, विजय चव्हाण, वसंत सिसोदे, वनकर्मचारी जामनेर व माजी सरपंच दत्ता साबळे, सरपंच पती बंडू पाटील, पो. पा. समाधान महाजन, अनिल पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here