साईमत, साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भुसावळचा वाढीव भाग असलेल्या सहा कॉलन्यांमध्ये पाणी नसल्यामुळे येथील रहिवाशांचा सोमवारी, १५ एप्रिल रोजी अकरा वाजेपासून ग्रामपंचायतीवर मोर्चा आणण्यात आला होता. यावेळी साकेगाव शिवारातील पाणीपुरवठ्याचा विषय प्रचंड गाजला. याप्रसंगी भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अर्थात बीडीओ सचिन पानझडे यांनी पाणीपुरवठ्याच्या विषयावर तीन ते चार तास मॅरेथॉन बैठक घेतली. साकेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तसेच साकेगाव व भुसावळच्या सीमा रेषेवर या भागात तब्बल पाच हजार लोकांचा रहिवास आहे. यासाठी साकेगाव ग्रामपंचायतने जलजीवन मिशन अंतर्गत एक ते दीड वर्षापूर्वी साकेगाव येथून विस्तीर्ण भागासाठी एक जलवाहिनी व महालक्ष्मी नगरमध्ये एक जलकुंभ बांधण्यात आला आहे. तेथील रहिवाशांकडून ग्रामपंचायत…
Author: Sharad Bhalerao
साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील शिरागड येथे आई सप्तश्रृंगी देवी मंदिराजवळील तापी नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेले जळगाव येथील दोन सतरा वर्षीय मुले पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे यावल तालुक्यासह जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तालुक्यातील शिरागड येथे सोमवारी, १५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराजवळ १७ वर्षीय दोन मुले तापी नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यांना तापी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना घडली. दोन्ही १७ वर्षीय मुले जळगाव येथील रामानंद नगर आणि…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी समतेचा, ममतेचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार संविधानाच्या माध्यमातून आपल्याला देऊन आपले जीवन सोन्यासारखे केले आहे. तसेच आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास आपल्याला डॉ.बाबासाहेब यांच्यामुळेच मिळाला आहे. अशा महामानव डॉ.बाबासाहेब यांच्यामुळे समाजाचे सोनं झाले आहे, असे प्रतिपादन अशांतभाई वानखेडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भीमनगर येथून महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत महामानवांना अभिवादन करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. अरविंद कोलते, नगरसेवक राजू…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील राजस्थानी महिला मंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणगोर सण उत्साहात साजरा करण्यात आला. शिवपार्वतीचे स्वरूप म्हणून मारवाडी समाजात गोरा व ईसर यांचे गीत गायन करून आराधना केली जाते. होळीच्या पाचव्या दिवसानंतर पंधरा दिवस हा कार्यक्रम साजरा केला जातो. कार्यक्रमाचे आयोजन राजस्थानी महिला मंडळ पार्वतीबाई चिंचोली यांच्या घरापासून होते. कार्यक्रमात रुक्मिणी चिंचोली, सरिता चिंचोले, रोहिणी सोनी, अश्विनी सोनी, संगीता बुळे, योगिता बुळे, सुनिता बुळे, मंजू मोयल, उषा मोयल, प्रियंका मोयल, मीना शर्मा, मिना बनभेरू यांच्यासह समस्त राजस्थानी महिला मंडळ जामनेर सहभागी झाले होते.
साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर येथून जवळील वेळोदे गावातील ट्रक चालक बंशीलाल आत्माराम पारधी यांचा मुलगा शुभमने कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता घरीच ऑनलाईन व ऑफलाइन अभ्यास करून २०२१ मध्ये प्रीलियम व २०२२ मेन्स परीक्षा पास करून नुकत्याच १२ तारखेला लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती मिळविली. त्यामुळे ट्रक ड्रायव्हरचा मुलगा आता पीएसआय अर्थात ‘फौजदार’ झाला आहे. शुभमच्या यशाबद्दल त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. येथून जवळील वेळोदे हे गाव जळगाव-धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील अनेर नदीच्या काठी वसलेले तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने वास्तव्याला आहेत. गावात पारधी समाजाचे जवळपास १०० च्यावर कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यापैकी बंशीलाल आत्माराम…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरासह तालुक्यात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. मुक्ताईनगर येथील मुख्य असलेल्या प्रवर्तन चौकात सकाळी नऊ वाजता महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांना माल्यार्पण करत सर्व समाज बांधवातर्फे अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष शरद बोदडे आणि भारतीय बौद्ध महासभेचे विश्वंभर अडकमोल यांनी उपस्थित तरुण, बालक, बालिका, महिला, पुरुष यांना त्रिशरण पंचशील दिले. ते सामूहिकरित्या उपस्थित बांधवांनी ग्रहण केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.ए.भोई यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे सर्व…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न आहे. त्यांचे विचार आणि कार्य हे अगाध आहे. त्यांच्या विविधांगी पैलूमुळे बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व हे उजळून निघते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही प्रणाली व्यवस्था यांच्यामध्ये एक अतूट नाते बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीवर नितांत श्रद्धा आणि प्रेम आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आणि विचारांमध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांचे विचार हे कृतीत आणून समाज उत्थानाचे काम करावे. ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ हा मूलमंत्र जोपासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यासाठी आपणही वचनबद्ध होऊ या, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते डॉ.…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर येथील नागवेली बारी पंच मंडळ आणि समस्त बारी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत रुपलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सर्व चिमुकल्यांनी वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान करून ‘माऊली माऊली’च्या जयघोषात पहूर नगरी दुमदुमून गेली होती. दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. रात्री पहूरचे किर्तनकार ह.भ.प.मुकूंद महाराज यांच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी बारी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष माधव काळे, उपाध्यक्ष मधुकर नागपुरे, सचिव रवींद्र काळे, पहूर पेठचे सरपंच अबु तडवी, माजी सरपंच प्रदीप लोढा, माजी जि.प.सदस्य…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित ए.बी.हायस्कुलच्या २९ विद्यार्थ्यांची एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यात ओम सोमनाथ माळी याने ९५ गुण मिळवित यश संपादन केले. ब्राह्मणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते, जल व पर्यावरण प्रेमी, पत्रकार सोमनाथ माळी यांचा ओम चिरंजीव आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक के.एन.तडवी (आ.बं. मुलांचे हायस्कुल), मुख्याध्यापिका सुलोचना इंगळे (आ.बं.मुलींचे हायस्कुल), ज्येष्ठ शिक्षक विजय पाखले, दिलीप शिंदे, निलेश सोमवंशी यांचे मार्गदर्शन केले. यशाबद्दल सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल, अध्यक्ष आर.सी. पाटील, सचिव डॉ. विनोद कोतकर, आ.बं.मुलांच्या हायस्कुलचे चेअरमन योगेश अग्रवाल, आ.बं.मुलींच्या…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या खासदार पदाचा खा.उन्मेष पाटील यांनी राजीनामा देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत गटात प्रवेश केल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेत नवचैतन्य संचारले आहे. अशातच चाळीसगाव विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे मोरसिंग चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा मुंबई येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी पार पडला. यावेळी जळगाव जिल्ह्याचे संपर्क मंत्री संजय सावंत यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे मान्यवर, मातब्बर, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते. जळगाव लोकसभा मतदारसंघात संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटात भाजपाचे खा.उन्मेष…