तापी नदीतील पात्रात दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

0
1

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील शिरागड येथे आई सप्तश्रृंगी देवी मंदिराजवळील तापी नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेले जळगाव येथील दोन सतरा वर्षीय मुले पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे यावल तालुक्यासह जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

तालुक्यातील शिरागड येथे सोमवारी, १५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराजवळ १७ वर्षीय दोन मुले तापी नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यांना तापी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना घडली. दोन्ही १७ वर्षीय मुले जळगाव येथील रामानंद नगर आणि वाघनगर येथील रहिवासी आहे. ते आपल्या नातेवाईकांकडे (बकऱ्या चारणारे आहेत किंवा कसे याबाबतची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे) आले होते.

देवीच्या मंदिराजवळ स्नान करण्यासाठी तापी नदी पात्रात गेल्यानंतर घटना घडली. घटनास्थळी काही उपस्थितांनी तात्काळ त्यांना बाहेर काढून यावल रुग्णालयात आणले. तेव्हा तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही मुलांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी, भरत कोळी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here