साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील राजस्थानी महिला मंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणगोर सण उत्साहात साजरा करण्यात आला. शिवपार्वतीचे स्वरूप म्हणून मारवाडी समाजात गोरा व ईसर यांचे गीत गायन करून आराधना केली जाते. होळीच्या पाचव्या दिवसानंतर पंधरा दिवस हा कार्यक्रम साजरा केला जातो. कार्यक्रमाचे आयोजन राजस्थानी महिला मंडळ पार्वतीबाई चिंचोली यांच्या घरापासून होते.
कार्यक्रमात रुक्मिणी चिंचोली, सरिता चिंचोले, रोहिणी सोनी, अश्विनी सोनी, संगीता बुळे, योगिता बुळे, सुनिता बुळे, मंजू मोयल, उषा मोयल, प्रियंका मोयल, मीना शर्मा, मिना बनभेरू यांच्यासह समस्त राजस्थानी महिला मंडळ जामनेर सहभागी झाले होते.