साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
येथील नागवेली बारी पंच मंडळ आणि समस्त बारी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत रुपलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सर्व चिमुकल्यांनी वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान करून ‘माऊली माऊली’च्या जयघोषात पहूर नगरी दुमदुमून गेली होती. दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. रात्री पहूरचे किर्तनकार ह.भ.प.मुकूंद महाराज यांच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी बारी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष माधव काळे, उपाध्यक्ष मधुकर नागपुरे, सचिव रवींद्र काळे, पहूर पेठचे सरपंच अबु तडवी, माजी सरपंच प्रदीप लोढा, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, रामेश्वर पाटील, सलीम मौलाना, शाम सावळे, अरुण घोलप, रवी घोलप, समाधान पाटील, विजय पांढरे, संजय पाटील, गोकुळ कुमावत, सुधाकर देशमुख, रमेश पांढरे, शरद पांढरे, संजय वेंडर, शिवाजी देशमुख, साहेबराव देशमुख, योगेश कुमावत, संपत कुमावत, सुनील गोंधळी, अरुण नागपुरे, जगदीश नागपुरे, मंगेश काळे, चंद्रकांत नागपुरे, ज्ञानेश्वर नागपुरे, प्रकाश काळे यांच्यासह समस्त बारी समाज, ग्रामस्थ उपस्थित होते.