साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करून वारीप्रसंगी ‘निर्मल वारी, हरित वारी, प्लास्टिक, कचरा मुक्त वारी’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करून स्वयंसेवकांनी आपल्या जीवनात समाजसेवेचे व्रत अंगी बाणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर युवकच देशाच्या सर्वांगीण विकासात हातभार लावू शकतात, असा विश्वास डॉ. सचिन नांद्रे (रासेयोचे संचालक, क.ब.चौ.उ.म.वि, जळगाव) यांनी व्यक्त केला. मुक्ताई मंदिर कोथळी येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग व खडसे महाविद्यालय, आणि संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुक्ताई पालखीच्या पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि ‘निर्मल वारी, हरित वारी, प्लास्टिक, कचरा मुक्त वारी’…
Author: Sharad Bhalerao
साईमत, फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी शहरात बकरी ईद सण उत्साहात साजरा करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी केले. ते फैजपूर पोलीस ठाण्यात आयोजित बकरी ईदनिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. येत्या सोमवारी, १७ जून रोजी बकरी ईद सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी स.पो.नि. निलेश वाघ यांनी ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज अदा केली जाणार असल्याने इदगाह व इदगाह परिसरात साफसफाई व ईद सण काळात सुरळीत वीज पुरवठासाठी पत्र दिले आहे. तसेच दरवर्षाप्रमाणे आपल्या भारत देशात बकरी ईद साजरी…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील ज्ञानगंगा विद्यालयात शनिवारी, १५ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सवासह पुस्तक आणि गणवेशाचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी जामनेर नगरपालिकेचे माजी गटनेता डॉ.प्रशांत भोंडे होते. यावेळी प्राचार्य राजेंद्र सोनवणे, देवीदास काळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. याप्रसंगी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. त्यानंतर प्राचार्यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांसह गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी स्वच्छता, आरोग्य व शिस्तबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पालक सभा घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती, शालेय शिष्यवृत्ती, अध्ययन व अध्यापनाबाबत चर्चा तसेच शाळा फी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांपूर्वी तांबोळे गावाकडे जाणाऱ्या तितुर नदीवरील पूल ‘धोकेदायक पूल’ म्हणून जाहीर करा, अशा ठळक मथळ्याखाली बातमी दैनिक ‘साईमत’मध्ये प्रकाशित केली होती. त्यानंतर यासाठी आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश येऊन पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुलाचे काम सुरू होते. पावसाळ्यापूर्वी पुलावरून जाण्या-येण्याचा मार्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. याबद्दल आ.मंगेश चव्हाण, दैनिक साईमत यांच्यासह विशाल धनगर यांचे परिसरातील सर्व ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. तालुक्यातील तांबोळी बु., खु. चितेगाव, पिंप्री, गणेशपूर, ओढरे, शिंदी, जुनपाणी या गावातील रहिवासी आणि महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. या भागातील नागरिकांचा दळणवळणाचा मुख्य रस्ता…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात शुक्रवारी, १४ जून रोजी दुपारी काही भागात मुसळधार पाऊस बरसला आहे. या जोरदार पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. दरम्यान माळशेवगे, तमगव्हाण परिसरात सुमारे दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. परिसरातील यंदाचा पहिलाच पाऊस आहे. जोरदार पावसामुळे नदी, नाले अक्षरशा वाहून निघाले. माळशेवगे भागात ढगफुटी सदृश्य पाऊस होता, असे नागरिकांनी सांगितले. तब्बल दोन वर्षानंतर या भागातील नदी, नाले खळखळून वाहत होते. तालुक्याच्या इतर भागातही कमी अधिक प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळ परिस्थिती होती. पावसाळा सुरू झाला तरी काही गावांमध्ये टँकर सुरू होते.…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील चोपडे एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी, १४ जून रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. जयेश गुजराथी उपस्थित होते. मेळाव्यामुळे माजी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. मेळाव्यात मार्गदर्शक डॉ. जयेश गुजराथी यांनी माजी विद्यार्थ्यांना नॅकची संकल्पना समजून सांगितली. नॅक हे महाविद्यालयाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी असले तरी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे. विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक हेदेखील महाविद्यालयाच्या गुणवत्तेत मोलाची भूमिका बजावितात, हे लक्षात आणून दिले. म्हणून महाविद्यालयातून शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढविण्यासाठी महाविद्यालयात सहभाग नोंदवावा. नेहमी मार्गदर्शन करावे आणि सल्ला द्यावा, असे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी वत्सलाबाई दादा पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडीची विशेष सभा शुक्रवारी, १४ जून रोजी दुपारी २ वाजता पार पडली. निवडीवेळी अध्यासी अधिकारी म्हणून गोंडगावच्या मंडळाधिकारी राजश्री जानराव होत्या. त्यांना ग्रामसेवक राजेंद्र सोनवणे यांचे सहकार्य लाभले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच वत्सलाबाई पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ही निवड ठरल्याप्रमाणे नकुल सैंदाणे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी करण्यात आली. यावेळी मावळते सरपंच नकुल सैंदाणे, उपसरपंच वंदनाबाई पाटील, सदस्या मनिषा पाटील, सीताराम पवार, अनिता मांग, शिवाजी भील आदी सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यात सर्रास वृक्ष तोड सुरु असल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष घालत नसल्याने वृक्ष तोडीवर आळा घालून कारवाईची मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. दरम्यान, गुरुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अमळनेर निम रस्त्यावर पिंपऱ्या नाल्याजवळ लाकूड तोड करून लाकडांनी भरलेले दोन ट्रॅक्टर वाहतूक करण्यात आले आहे. यासंदर्भातही चौकशीची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळा अत्यल्प होत चालला असताना दिवसेंदिवस सर्वत्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. बिनधास्त वृक्षतोड़ केली जात आहे. यावर्षी लवकर शेत शिवारातील कामे आटोपल्याने शेतात वृक्षतोड सुरु आहे. थोड्याशा पैसेकरिता शेतातील मध्यभागी व बांधावर उभे असलेले डेरेदार वृक्ष तोडले जात आहेत. परिणामी शेत शिवारात झाडांची…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यातील धरणगावात मातोळा तालुक्यातील डिडोळा, येथील रहिवासी दीपक सुधाकर सोनोने (वय २१) तरुणाचा धरणगावात निर्घुणपणे खून झाल्याची घटना शुक्रवारी, १४ जून रोजी पहाटेच्या सुमारास उघड झाली. दरम्यान, याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. मोताळा तालुक्यातील डिडोळा येथील दीपक सुधाकर सोनोनेे ह्या तरुणाचा धरणगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा सामाजिक सभागृहाच्या आत रक्ताच्या सारोळ्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती धरणगाव येथील पोलीस पाटील यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. खुनाचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मयत तरुणाचा मृतदेह मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेनासाठी…
साईमत, शरद भालेराव, जळगाव : अर्धा जून महिना उलटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४० टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र सात लाख ४९ हजार हेक्टर इतके आहे. त्यापैकी ११ जून अखेरपर्यंत एक लाख चार हजार हेक्टर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवळ ४० टक्के पेरण्या केल्याची नोंद जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी दमदार पावसाची गरज आहे. तेव्हाच उर्वरित महत्त्वाच्या पेरण्यांना वेग येणार असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. खान्देशचे नगदी पीक ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची पाच लाख ५८ हजार ३९२…