बकरी ईदचा सण उत्साहात साजरा करुन पोलिसांना सहकार्य करावे

0
2
oplus_0

साईमत, फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी

शहरात बकरी ईद सण उत्साहात साजरा करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी केले. ते फैजपूर पोलीस ठाण्यात आयोजित बकरी ईदनिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. येत्या सोमवारी, १७ जून रोजी बकरी ईद सण साजरा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी स.पो.नि. निलेश वाघ यांनी ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज अदा केली जाणार असल्याने इदगाह व इदगाह परिसरात साफसफाई व ईद सण काळात सुरळीत वीज पुरवठासाठी पत्र दिले आहे. तसेच दरवर्षाप्रमाणे आपल्या भारत देशात बकरी ईद साजरी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर फैजपूर शहरात बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा आणि शासनाने परिपत्रक काढले आहे. त्याचे पालन करून कोणाच्या भावना दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी. व्यासपीठावर उपस्थित नागरिक अब्दुल रऊफ जनाब यांनीही बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा. कोणाच्या भावना दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी, असे मनोगतात सांगितले.

यांची होती उपस्थिती

बैठकीला रऊफ जनाब, वीज महावितरणचे इंजिनियर प्रशांत सरोदे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष अनंता नेहते, सय्यद जावेद अहमद, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख रियाज, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, माजी उपनगराध्यक्ष कलीम खां मण्यार, माजी नगरसेवक शेख जफर, माजी नगरसेवक संजय रल, पंडित कोल्हे, मलिक आबीद, जावेद कुरेशी, माजी नगरसेवक अप्पा चौधरी, शेख जलील हाजी शेख सत्तार मेंबर, इरफान मेंबर, वसीम जनाब, डॉ. दानिश शेख, शेख आसिफ मेकॅनिकल, हर्षल दानी, शेख मुदसर नजर, फिरोज खान, शेख इजाज, भास्कर सोनवणे, शाकीर शेख, रशीद बाबू तडवी, पत्रकार प्रा.उमाकांत पाटील, समीर तडवी, शाकीर मलिक, फारुख शेख मण्यार, सलीम पिंजारी, राजू तडवी, योगेश सोनवणे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गोपनीय विभागाचे पोलीस योगेश दुसाने, हे. कॉ. रवींद्र मोरे, पो. कॉ. दिनेश भोई यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here