तमगव्हाण, माळशेवगे परिसरात बरसला मुसळधार पाऊस

0
25

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यात शुक्रवारी, १४ जून रोजी दुपारी काही भागात मुसळधार पाऊस बरसला आहे. या जोरदार पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. दरम्यान माळशेवगे, तमगव्हाण परिसरात सुमारे दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले.

परिसरातील यंदाचा पहिलाच पाऊस आहे. जोरदार पावसामुळे नदी, नाले अक्षरशा वाहून निघाले. माळशेवगे भागात ढगफुटी सदृश्‍य पाऊस होता, असे नागरिकांनी सांगितले. तब्बल दोन वर्षानंतर या भागातील नदी, नाले खळखळून वाहत होते. तालुक्याच्या इतर भागातही कमी अधिक प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळ परिस्थिती होती. पावसाळा सुरू झाला तरी काही गावांमध्ये टँकर सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दमदार पावसाची प्रतिक्षा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here