Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»तांदुळवाडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी वत्सलाबाई पाटील बिनविरोध
    चाळीसगाव

    तांदुळवाडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी वत्सलाबाई पाटील बिनविरोध

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी वत्सलाबाई दादा पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडीची विशेष सभा शुक्रवारी, १४ जून रोजी दुपारी २ वाजता पार पडली. निवडीवेळी अध्यासी अधिकारी म्हणून गोंडगावच्या मंडळाधिकारी राजश्री जानराव होत्या. त्यांना ग्रामसेवक राजेंद्र सोनवणे यांचे सहकार्य लाभले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच वत्सलाबाई पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ही निवड ठरल्याप्रमाणे नकुल सैंदाणे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी करण्यात आली. यावेळी मावळते सरपंच नकुल सैंदाणे, उपसरपंच वंदनाबाई पाटील, सदस्या मनिषा पाटील, सीताराम पवार, अनिता मांग, शिवाजी भील आदी सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर त्यांच्या सत्कारासह वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

    याप्रसंगी मळगाव-तांदुळवाडी विकासोचे चेअरमन जयवंतराव पाटील, दादा पाटील, अर्जुन पाटील, भाऊसाहेब पाटील, बाबुराव पवार, नागो पवार, विजय पाटील, ग्रामस्थ, तलाठी करण कुलकर्णी, पो. कॉ. नरेंद्र विसपुते, पो. कॉ. दिलीप पाटील, पोलीस पाटील किरण बागुल, कोतवाल कविता सोनवणे, शितल राजपूत, राजेंद्र महाजन उपस्थित होते.

    यशस्वीतेसाठी सेवक अशोक पाटील, सफाई कर्मचारी रवींद्र खैरनार, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी राजेंद्र महाजन यांच्यासह ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन शरद पाटील यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘भूकंप’चे संकेत? भाजप मित्रपक्षांवरच डाव साधणार असल्याचा बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

    April 12, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.