जामनेरातील ज्ञानगंगा विद्यालयात प्रवेशोत्सवासह पुस्तकांचे वितरण

0
1

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

येथील ज्ञानगंगा विद्यालयात शनिवारी, १५ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सवासह पुस्तक आणि गणवेशाचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी जामनेर नगरपालिकेचे माजी गटनेता डॉ.प्रशांत भोंडे होते. यावेळी प्राचार्य राजेंद्र सोनवणे, देवीदास काळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. याप्रसंगी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. त्यानंतर प्राचार्यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांसह गणवेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी स्वच्छता, आरोग्य व शिस्तबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पालक सभा घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती, शालेय शिष्यवृत्ती, अध्ययन व अध्यापनाबाबत चर्चा तसेच शाळा फी मंजुरी, शालेय पोषण आहार आदीबाबत विषय घेण्यात आले. नंतर ५वी ते इ.८वीच्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना गोड मेनूसह शालेय पोषण आहार देण्यात आला. मुलांच्या किलबिलाटाने शाळेचा पारिसर पहिल्याच दिवशी गजबजून आणि आनंदून गेला होता.

संस्थेचे अध्यक्ष ना.गिरीश महाजन, सचिव साधना महाजन, ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. शिवाजी सोनार यांच्यासह सर्व संचालक मंडळाने नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विजय कोळी तर आभार योगेश बावस्कर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here