Author: Sharad Bhalerao

साईमत/ न्यूज नेटवर्क/ यावल : शहरात मुख्य रस्त्यांवर बेकायदा अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक आणि पार्किंग, गुन्हेगारी, अवैध धंद्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे यावल शहरासह परिसराचा जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था, शांतता धोक्यात आली आहे. एखाद्या वेळेस फार मोठी अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात शांतता समितीच्या सदस्यांनी ठोस निर्णय घेऊन सदस्यांनी शहराच्या शांततेसाठी हिताचा ठराव करून संबंधित अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी देण्याची गरज आहे. असे न झाल्यास संपूर्ण यावलकरांना त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील, असे संपूर्ण यावल शहरासह तालुक्यात चर्चिले जात आहे. यावल पोलीस स्टेशनला ६५ संख्याबळ मंजूर आहे. मात्र, त्यापैकी २४ पोलीस अंमलदार कमी आहे. पोलीस स्टेशन…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव : पिंप्राळा परिसरातील सावखेडा रस्त्यालगत सोनी नगर येथील जागृत स्वयंभू महादेव मंदिराच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त गुरूवारी, ११ जुलै रोजी पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात शिवलिंगाची पूजा, दुग्धाभिषेक, महाआरतीसह प्रसादाचे वाटप अशा कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेवाची शिवलिंग २०१७ मध्ये श्रावण सोमवारी आढळून आली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी ११ जुलै २०१८ मध्ये पत्र्याच्या शेडमध्ये ओटा बांधुन विधीवत पूजा करून स्थापना केली होती. ११ जुलै रोजी पहाटे साडे पाच वाजता महादेवाच्या शिवलिंगाची ज्येष्ठ नागरिक देविदास पाटील यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता रामनिवास गुप्ता, सोनू गुप्ता, इंदल परदेशी यांच्या…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मित्र पक्षांसह भाजपच्या विरोधात खोटे आरोप करण्यात आले. शिवाय विरोधकांनी निवडणुकीत जनतेला वारेमाप आश्वासन दिले होते, जे कधीच पूर्ण होणार नव्हते. तसेच विरोधकांनी सर्व जंग-जंग पछाडुनही नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात तालुक्यासह जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले. शहरातील शिवाजी नगर लगतच्या एकलव्य शाळेच्या आवारात आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अजय भोळे, चंद्रकांत बाविस्कर, संजय गरुड, प्रदीप लोढा, दिलीप खोडपे, जे.के.चव्हाण, नाना पाटील, शेख अनिस, नाजीम पार्टी, आतीष झाल्टे,…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/जळगाव : माजी विभागीय महसूल आयुक्त रवींद्रसिंग जालमसिंग जाधव (वय ७३) यांचे हृदयविकाराने मंगळवारी (९ जुलै) सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावाई असा परिवार आहे. त्यांच्यावर जळगाव येथे सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री.जाधव आपल्या मूळ गावी टाकरखेडा (ता.मोताळा, जि.बुलढाणा) येथे गेलेले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. श्री. जाधव माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे स्वीय सहाय्यक (राष्ट्रपती पदावर असतांना) होते. त्यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात जळगाव जिल्ह्याचे प्रांताधिकारी नंतर अमरावती जिल्ह्यासाठी, राज्याचे माहिती आयुक्त (पुणे विभाग) सेवानिवृत्तीनंतर ते जळगावात स्थायिक झाले होते.

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर : तालुक्यातील केकतनिंभोरा, टाकळी, वाघारी, नेरी, पहुर, पाळधी चिलगाव, लोहारा गावात ६१३ वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षलागवडीसाठी ४०९ ‘श्री’ सदस्य उपस्थित होते. रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) येथील श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जामनेर तालुक्यातील गावांमध्ये कडूनिंब, वड, पिंपळ, करंज, चिंच, आंबा, अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. दरवर्षाप्रमाणे यंदाही नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षसंवर्धन करण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात येऊन त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वृक्षलागवडीत चिलगावच्या ‘श्री’ बैठकीतून शेंदुणीला २५ ‘श्री’ सदस्यांनी ५० वृक्षांची लागवड केली. तसेच वाघारीच्या ‘श्री’ बैठकीतून ४० ‘श्री’ सदस्यांनी ५०, नेरी ‘श्री’ बैठकीतून माळपिंप्रीला ७५ ‘श्री’ सदस्यांनी १०७, पाळधी ‘श्री’ बैठकीतून मराठी शाळेत…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/यावल : डॉक्टर दिनानिमित्त आश्रय फाउंडेशन यावल, रावेरतर्फे फैजपूर येथे शुभ दिव्य सभागृहात स्नेहमिलनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. स्नेह मेळाव्याला डॉ. उमेश चौधरी, डॉ.गणेश भारंबे, डॉ.सुनील चौधरी, डॉ. व्ही.जे.वारके, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.दत्तप्रसाद दलाल, डॉ.संगिता महाजन, रावेर आणि यावल परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक मान्यवरांचे सहकुटुंब उपस्थित होते. स्नेहमेळाव्यात अनेकांनी मनोगत व्यक्त केली. विविध समाजहिताचे सामाजिक उपक्रम राबवत रावेर आणि यावल तालुक्यात आश्रय फाउंडेशन समाजसेवी संस्थेच्या व कांताई स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने अनेक आरोग्य संदर्भातील शिबिर आयोजित करून १० हजार रूग्णांच्या डोळ्यांच्या मोतीबिंदूंची मोफत तपासणी करण्यात आली. त्यातील १ हजार रूग्णांच्या डोळयांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच बेरोजगारांसाठी…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/रावेर : शहरातून बऱ्हाणपूर रस्त्यावरुन सार्वजनिक ठिकाणी एक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनने संशयित आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी मोटारसायकल जप्त केल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी आरोपीला रावेर न्यायालयात हजर केल्यावर त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. रावेर तालुक्यातील तामसवाडी येथील बंडू प्रभाकर महाजन (वय ४५) यांची दुचाकी चोरीस गेली होती. त्यानंतर त्यांनी रावेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्यानुसार रावेर पोलीस स्टेशनला ५ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. गोपनीय माहितीनुसार भुसावळ तालुक्यातील वरणगावातून रामपेठ परिसरातून संशयित आरोपी जितेंद्र नारायण सोनवणे (वय ३२) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या रावेर फैजपूर पोलीस…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर : विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. मलकापूर येथील नळगंगा नदीला पाणी आले आहे. त्यातच तालुक्यामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे त्यातच तालुक्यातील वळजी येथील अपंग असलेले संदीप इंगळे यांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यांनी ग्रामपंचायतीला वारंवार सांगून रस्त्यावर कोणतेही काम न केल्याने तसेच मुरूमही न टाकल्याने इंगळे यांच्या घरात पाणी शिरल्याने त्याचा संसार उघड्यावर आला आहे. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. जून महिन्यात जेमतेम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतीची काम अाटोपले तर पावसाची…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव : तालुक्यातील ब्राह्मणशेवगे पंचक्रोशीत पंधरा दिवसांपासून वरुणराजाने दडी मारली आहे. वरुणराजा चांगला बरसावा, यासाठी दरवर्षी पावसाळा सुरु होण्याअगोदर प्रत्येक गाव वेशीवरून शिवाई देवीची पूजाअर्चा करून पुढील गावाच्या वेशीवर ढोलताश्यासारखे वाद्य लाऊन वाजत गाजत पुढच्या वेशीवर ठेवले जाते. अशा प्रकारे दरवर्षी ही परंपरा जपली जात आहे. जुन्या परंपरांनुसार एका गावाने दुसऱ्या गावाच्या शिवेवरून (वेशीवरून) आपल्या गावाच्या शिवेवर (वेशीवर) छोटे बैलगाडे, टोपली, अंडे, नारळ तसेच हळद कुंकुने पूजाअर्चा करुन गाव शिवेवर ठेवण्यात आलेल्या बैलगाडेचे पूजन करुन वरुणराजाला साकडे घालण्यात येते. यानंतर दुसऱ्या गावाच्या शिवेवर (वेशीवर) अशाच पद्धतीने पुढील गावाच्या वेशीवर सोडून दिले जाते. त्यामुळे वरुणराजा बरसतो, अशी शेकडो वर्षांपासून…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यामंदिर आणि स्व.दे.ना.पाटील हायस्कुल, चौबारी शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम मंत्री ना.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते. यावेळी ना. अनिल पाटील यांनी श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी दिल्या जाणाऱ्या साहित्याबद्दल कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या माध्यमातून संस्थेच्या हजारावर विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश पुरविले जातात. यावेळी मुख्याध्यापक रणजित शिंदे, स्व. दे.ना.पाटील हायस्कुल चौबारीचे मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ना. पाटील यांचा सामूहिक सत्कार केला. याप्रसंगी सरस्वती विद्या…

Read More