साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव :
पिंप्राळा परिसरातील सावखेडा रस्त्यालगत सोनी नगर येथील जागृत स्वयंभू महादेव मंदिराच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त गुरूवारी, ११ जुलै रोजी पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात शिवलिंगाची पूजा, दुग्धाभिषेक, महाआरतीसह प्रसादाचे वाटप अशा कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेवाची शिवलिंग २०१७ मध्ये श्रावण सोमवारी आढळून आली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी ११ जुलै २०१८ मध्ये पत्र्याच्या शेडमध्ये ओटा बांधुन विधीवत पूजा करून स्थापना केली होती. ११ जुलै रोजी पहाटे साडे पाच वाजता महादेवाच्या शिवलिंगाची ज्येष्ठ नागरिक देविदास पाटील यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता रामनिवास गुप्ता, सोनू गुप्ता, इंदल परदेशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीकृष्ण मेंगडे यांच्याकडून केळ्याचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. सोहळ्यात भाविकांनी सहभागी होऊन मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नरेश बागडे यांच्यासह मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.