आश्रय फाउंडेशनतर्फे डॉक्टर दिनानिमित्त स्नेहमिलनाचा कार्यक्रम

0
51

साईमत/ न्यूज नेटवर्क/यावल :

डॉक्टर दिनानिमित्त आश्रय फाउंडेशन यावल, रावेरतर्फे फैजपूर येथे शुभ दिव्य सभागृहात स्नेहमिलनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. स्नेह मेळाव्याला डॉ. उमेश चौधरी, डॉ.गणेश भारंबे, डॉ.सुनील चौधरी, डॉ. व्ही.जे.वारके, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.दत्तप्रसाद दलाल, डॉ.संगिता महाजन, रावेर आणि यावल परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक मान्यवरांचे सहकुटुंब उपस्थित होते. स्नेहमेळाव्यात अनेकांनी मनोगत व्यक्त केली.

विविध समाजहिताचे सामाजिक उपक्रम राबवत रावेर आणि यावल तालुक्यात आश्रय फाउंडेशन समाजसेवी संस्थेच्या व कांताई स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने अनेक आरोग्य संदर्भातील शिबिर आयोजित करून १० हजार रूग्णांच्या डोळ्यांच्या मोतीबिंदूंची मोफत तपासणी करण्यात आली. त्यातील १ हजार रूग्णांच्या डोळयांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच बेरोजगारांसाठी ऑनलाईन नोकरी मिळुन देण्यासाठी मेळावा आयोजित करत ९०० तरूण बेरोजगारांना नोकरीस लावण्यात यश मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.विलास चौधरी, सचिव डॉ.पराग पाटील, खजिनदार डॉ. राजेश चौधरी, सदस्य डॉ.भरत महाजन, डॉ. शैलेश खाचणे, डॉ.नितीन महाजन, डॉ. ललीत बोरोले, डॉ.प्रशांत जावळे, डॉ. ताराचंद साळवे, डॉ.आशिष सरोदे, डॉ.चेतन कोळंबे, डॉ.योगेश पाटील, डॉ.गौरव धांडे, डॉ.दिलीप भाटकर, डॉ.प्रफुल पाटील, डॉ.प्रसाद पाटील, डॉ.निलेश पाटील, डॉ.अभिजित सरोदे, डॉ.प्रशांत भारंबे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here