माजी महसूल आयुक्त रवींद्रसिंग जाधव यांचे निधन

0
3

साईमत/ न्यूज नेटवर्क/जळगाव :

माजी विभागीय महसूल आयुक्त रवींद्रसिंग जालमसिंग जाधव (वय ७३) यांचे हृदयविकाराने मंगळवारी (९ जुलै) सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावाई असा परिवार आहे. त्यांच्यावर जळगाव येथे सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री.जाधव आपल्या मूळ गावी टाकरखेडा (ता.मोताळा, जि.बुलढाणा) येथे गेलेले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

श्री. जाधव माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे स्वीय सहाय्यक (राष्ट्रपती पदावर असतांना) होते. त्यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात जळगाव जिल्ह्याचे प्रांताधिकारी नंतर अमरावती जिल्ह्यासाठी, राज्याचे माहिती आयुक्त (पुणे विभाग) सेवानिवृत्तीनंतर ते जळगावात स्थायिक झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here