यशाबद्दल अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील कार्यरत प्रा.दीपक रघुनाथ कल्याणकर यांनी सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळवून ‘वाणिज्य’ विषयात पीएचडी संपादन केली आहे. त्यांच्या यशाबद्दल अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे, सचिव प्रकाश काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ.उल्हास पाटील, महाविद्यालयातील सहकारी, प्रा.कल्याणकर यांच्यासह स्टापने कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Author: Sharad Bhalerao
शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : गलवाडा-वेताळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाच्या शिवसेनेचे फिरोज पठाण यांची सोमवारी, १२ ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड केली आहे. सरपंच पदाच्या निवडीसाठी सोमवारी गलवाडा ग्रामपंचायतीच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी मारोती धोंडकर होते. दरम्यान, सरपंच पदासाठी फिरोज पठाण यांचा एकमेव उमेदवारी अर्ज मिळाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी मारोती धोंडकर यांनी दुपारी दोन वाजता केली. सरपंचपदी फिरोज पठाण यांची बिनविरोध निवड होताच शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला. यावेळी विशेष सभेसाठी सभागृहात नऊ पैकी सहा सदस्य उपस्थित होते. उर्वरित तीन सदस्य अनुपस्थित होते. यावेळी सुशीला इंगळे,…
ग्रामीण रुग्णालयात रोज ५०० रुग्णांची तपासणी बालरोग तज्ज्ञांकडून…? साईमत/यावल/प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षांपासून येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्याकडे विविध समस्यांबाबत लेखी तक्रारी, निवेदन देऊन सुख- सुविधा उपलब्ध करून देत नसल्याने तसेच बौद्ध, दलित, आदिवासींचा जाणून-बुजून द्वेष करीत आहेत. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह महिलांना पाहिजे त्या आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने यावलच्या तहसिलदारांना वस्तुस्थिती माहिती होण्यासाठी ‘निळे निशाण’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष अनिल इंधाटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी यावल तहसील कार्यालयासमोर सोमवारी, १२ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात दररोज ५०० रुग्णांची तपासणी केली जात असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातर्फे ‘निळे निशाण’ संघटनेला देण्यात…
जळगाव जनता बँकेतर्फे न्यू प्लॉट परिसरात वृक्षारोपण साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : येथील नगरपरिषद आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॉट परिसरात वृक्षारोपण व ट्री गार्ड वाटपाला नुकताच प्रारंभ करण्यात आला. न्यू प्लॉट परिसर विकास मंच आणि छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुपच्या सहकार्याने अभियान राबविले जाणार आहे. उपक्रमास न.पा.चे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी प्रोत्साहन दिले आहे. उपक्रमांतर्गत संपूर्ण न्यू प्लॉट परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आपल्या घरासमोर ज्यांना वृक्षारोपण करावयाचे असेल त्यांना जळगाव जनता बँकेतर्फे ट्रीगार्ड व वृक्ष देण्यात येणार आहे. मात्र, वृक्षाचे संगोपन तथा जगविण्याची जवाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार आहे. वृक्ष जगविणाऱ्या मान्यवरांना जळगाव जनता बँकेतर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित…
आंदोलनकर्ते अभ्यासकांच्या नियोजन बैठकीत माजी खा.उन्मेश पाटील यांची भीमगर्जना साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : गिरणा खोरे अधिक समृद्ध करणारा नार-पार गिरणा खोरे प्रकल्पाबाबत राज्यपालांच्या स्वाक्षरीचे पत्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून बळीराजाची शुद्ध फसवणूक आहे. राज्य सरकारकडे पैसा नसल्याने हा प्रकल्प कधीच पूर्ण होणार नाही, हे माहीत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेली भूमिका ही बळीराजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचा हेतू आहे. केंद्राच्या निधीतून हा प्रकल्प मंजूर झाला तरच तो साकारला जाऊ शकतो. महाराष्ट्र सरकार हे गुजरात धार्जिणे झाल्याने प्रकल्पाबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे. नारपार गिरणा खोरे योजना पूर्तीसाठी प्रकल्पाबाबत सखोल माहिती असणाऱ्या अभ्यासकांची नियोजित बैठक झाली आहे. यात राज्य…
लोहाऱ्यात माझे सरकार केंद्र, लाडकी बहिण योजना, नेत्र तपासणी शिबिराप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी : महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि समाजातील प्रत्येक घटकांसाठी केंद्र आणि महायुती सरकार सर्वांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकार यांच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसेही लवकरच खात्यावर येतील, असेही त्यांनी सांगितले. लोहारा येथे रविवारी, ११ ऑगस्ट रोजी लोहारा येथील मराठी मुलांची शाळेच्या पटांगणावर भव्य सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. त्यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्यात आले. त्यानंतर लोहारा विविध कार्यकारी सोसायटी…
महादेवा…भाविकांना सद्बुध्दी देवो, सर्वांना सुख-समृद्धी लाभोच्या प्रार्थनेसह महाआरती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ‘श्रावण महिना’ महादेवाला प्रसन्न करण्याचा पवित्र महिना असल्याने महादेवा… भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख-समृद्धी लाभोच्या प्रार्थनेसह तीन जोडप्यांच्या हस्ते दुसऱ्या श्रावण सोमवारी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता महाआरती करण्यात आली. सोनी नगरातील भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे जागृत स्वयंभू महादेव मंदिरात नंदीदेवतासह महादेवाला पहाटे मधुकर ठाकरे आणि नरेश बागडे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. शिवभक्तांनी केळीचा प्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर महिंद्र साळुंखे -सुजाता साळुंखे, शाम राठोड-निलीमा राठोड, दिनेश राजपूत -वैशाली राजपूत तसेच डॉ.शाम बाविस्कर यांच्या हस्ते नंदीदेवता व जागृत स्वयंभू शिवलिंगाला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. महादेवा… भाविकांना सद्बुद्धी…
एरंडोल तालुक्यातील सावदे प्रचा येथील घटना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यातील सावदे प्र. चा. गावात एका कामगाराच्या डोक्यात दगड घालून व बैलगाडीचे शिंगाडे मारून त्याचा निर्घृण खून करुन ‘यमसदनी’ धाडल्याची धक्कादायक घटना रविवारी, ११ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. इंदल प्रकाश वाघ (वय २७, रा. सावदे प्र.चा., ता. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, तरुणाचा खून कोणी केला? याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत. सविस्तर असे की, एरंडोल तालुक्यातील सावदे गावातील खदानीत काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार…
उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी पाच गावात केली पाहणी साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : सोयगावसह तालुक्यात कपाशी पिकांवर आकस्मिक ‘मर’ रोगाचा वाढता प्रादुर्भाव झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर रविवारी सिल्लोडच्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या पथकांनी सोयगाव परिसरात पाच गावात पाहणी केली. जुलै महिन्यात सोयगावसह तालुक्यात कपाशी पिकांवर आकस्मिक ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. त्यात कपाशीची झाडे वाळून जळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. दरम्यान, तालुका कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरुन उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव यांच्या पथकाने सोयगाव, जरंडी, ठाणा, फरदापूर तांडा आदी भागात पाहणी करून शेतकऱ्यांना उपाय योजना करुन मार्गदर्शन केले. यावेळी शास्त्रज्ञ सी.बी.पाटील, तालुका कृषी अधिकारी मदन शिदोदिया, पंचायत…
सिल्लोड-सोयगावातून रंगनाथ काळे यांना उमेदवारी जाहीर करण्याची कार्यकर्त्यांनी घातली गळ साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या नुकत्याच सोयगावला झालेल्या संवाद यात्रा बैठकीत सिल्लोड-सोयगाव मतदार संघाची जागा कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यावी, असा निर्णय घेत सोयगावात महाविकास आघाडीच्या संवाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी मिळाली तरी एकजुटीने काम करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक (शरद पवार गट) मूलचंद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. बैठकीत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रंगनाथ काळे यांना सिल्लोड-सोयगाव मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्याची गळ घातली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सिल्लोड-सोयगावात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीची मूठ घट्ट केली आहे. त्यामुळे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक…