सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात जलाभिषेक

0
13

महादेवा…भाविकांना सद्बुध्दी देवो, सर्वांना सुख-समृद्धी लाभोच्या प्रार्थनेसह महाआरती

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

‘श्रावण महिना’ महादेवाला प्रसन्न करण्याचा पवित्र महिना असल्याने महादेवा… भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख-समृद्धी लाभोच्या प्रार्थनेसह तीन जोडप्यांच्या हस्ते दुसऱ्या श्रावण सोमवारी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता महाआरती करण्यात आली. सोनी नगरातील भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे जागृत स्वयंभू महादेव मंदिरात नंदीदेवतासह महादेवाला पहाटे मधुकर ठाकरे आणि नरेश बागडे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. शिवभक्तांनी केळीचा प्रसादाचा लाभ घेतला.

त्यानंतर महिंद्र साळुंखे -सुजाता साळुंखे, शाम राठोड-निलीमा राठोड, दिनेश राजपूत -वैशाली राजपूत तसेच डॉ.शाम‌ बाविस्कर यांच्या हस्ते नंदीदेवता व जागृत स्वयंभू शिवलिंगाला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली.
महादेवा… भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख-समृद्धी लाभो, अशी प्रार्थना आरतीच्या मानकऱ्यांनी केली. त्यानंतर शिवलिंगाला बेलपत्राने सजविण्यात आले होते. पहाटेपासून शिवभक्तांची दर्शनासाठी रिघ सुरू होती.

यावेळी अजय राणा, ममता राणा, नारायण येवले, विजय भावसार यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सोनी नगर, प्रल्हाद नगर, गणपती नगर, ओंकार पार्क, श्रीराम नगर, बाबुराव नगर परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here