न्यू प्लॉट परिसर हिरवागार करण्याचा संकल्प

0
20

जळगाव जनता बँकेतर्फे न्यू प्लॉट परिसरात वृक्षारोपण

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :

येथील नगरपरिषद आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॉट परिसरात वृक्षारोपण व ट्री गार्ड वाटपाला नुकताच प्रारंभ करण्यात आला. न्यू प्लॉट परिसर विकास मंच आणि छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुपच्या सहकार्याने अभियान राबविले जाणार आहे.

उपक्रमास न.पा.चे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी प्रोत्साहन दिले आहे. उपक्रमांतर्गत संपूर्ण न्यू प्लॉट परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आपल्या घरासमोर ज्यांना वृक्षारोपण करावयाचे असेल त्यांना जळगाव जनता बँकेतर्फे ट्रीगार्ड व वृक्ष देण्यात येणार आहे. मात्र, वृक्षाचे संगोपन तथा जगविण्याची जवाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार आहे. वृक्ष जगविणाऱ्या मान्यवरांना जळगाव जनता बँकेतर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी दिली.

मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक

जळगाव जनता बँकेचे मॅनेजर महेश गर्गे यांनी जास्तीत जास्त लोकांनी अभियानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत अनेकांनी मागणीही नोंदविली. अभियानात पहिले वृक्ष जगविण्याची जवाबदारी गॅलेक्झि स्टोअरचे राकेश माहेश्वरी यांनी स्वीकारली.

यांची लाभली उपस्थिती

याप्रसंगी महावीर पतपेढीचे चेअरमन प्रकाशचंद पारेख, डॉ.शरद बाविस्कर, उद्योजक दिलीप ललवाणी, पालिकेचे निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी, जैन जागृती सेंटरचे अधिक डॉ.संजय शाह, सोमचंद संदानशिव, प्रतीक जैन, नर्मदा लॉन्सचे कैलास पाटील, रघुनाथ पाटील, सौरभ टेंटचे भिकमचंद जैन, बिपिन पाटील, अनिल कोठारी, कैलास केदार, गणेश चौधरी, सुनील भोई, पो.कॉ. अनिल मोरे, अजय पोरवाल, महेश राजपूत, प्रतीक कोराणी, प्रितेश जैन, जयसिंग परदेशी, पंकज वाणी, अभिजित जैन, सतीश ठाकूर, ऋषीकेश शेळके, दीपक जोशी, भाऊसाहेब शिसोदे, योगेश पवार यांच्यासह जनता बँक शाखेचे सभासद, ग्राहक, कर्मचारी तसेच अमळनेर नगरपरिषदेचे कर्मचारी, परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here