सोयगाव तालुक्यात कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव वाढला

0
18

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी पाच गावात केली पाहणी

साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

सोयगावसह तालुक्यात कपाशी पिकांवर आकस्मिक ‘मर’ रोगाचा वाढता प्रादुर्भाव झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर रविवारी सिल्लोडच्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या पथकांनी सोयगाव परिसरात पाच गावात पाहणी केली.

जुलै महिन्यात सोयगावसह तालुक्यात कपाशी पिकांवर आकस्मिक ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. त्यात कपाशीची झाडे वाळून जळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. दरम्यान, तालुका कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरुन उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव यांच्या पथकाने सोयगाव, जरंडी, ठाणा, फरदापूर तांडा आदी भागात पाहणी करून शेतकऱ्यांना उपाय योजना करुन मार्गदर्शन केले.

यावेळी शास्त्रज्ञ सी.बी.पाटील, तालुका कृषी अधिकारी मदन शिदोदिया, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष भालेराव, कृषी पर्यवेक्षक रमेश गुंडीले, शेकणाथ भालेराव, पंचक्रोशीतील शेतकरी आदींनी सोयगाव परिसरात पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here