चाळीसगाव तालुक्यात प्रथमच चर्चेचा ठरला विवाहसोहळा साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी तालुक्यातील रांजणगाव येथील प्रगतीशील शेतकरी संतोष भीमसिंग परदेशी यांची सुकन्या तसेच विकास सोसायटीचे माजी चेअरमन भिकन रामचंद्र परदेशी यांची नात चि.सौ.कां. प्रिया हिचा विवाहसोहळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील व्यावसायिक देविसिंग ठाकूर यांचे चिरंजीव चेतन ठाकूर यांच्या सोबत फौजदार गार्डन कोदगाव चौफुली येथे नुकताच मोठ्या थाटात पार पडला. या लग्नानंतर दुपारी तीन वाजता नवरदेवाने सरप्राइज देत चक्क हेलिकॉप्टरमधून आपल्या नववधूला आपल्या गावात गंगापूर येथे घेऊन गेले. गावात प्रथमच एक अनोखा सोहळा पार पडला. यावेळी समस्त रांजणगावकर आपल्या गावाच्या मुलीला सोडवायला हेलिपॅडवर उपस्थित होते. नवदाम्पत्याचा गावातर्फे सत्कार यावेळी गावाच्यावतीने नवदाम्पत्याचा सरपंच प्रमोद चव्हाण, माजी…
Author: Sharad Bhalerao
महात्मा फुले स्मृतीदिन शिक्षक दिवस साजरा साईमत/अमळनेर/प्रतिनिधी क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिक्षक दिन साजरा करून महात्मा फुले हायस्कूलने नवा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या २२ वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २८ नोव्हेंबर हा दिवस महात्मा फुले स्मृतीदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. इयत्ता दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मुख्याध्यापकापासून ते शिपायापर्यंत भूमिका साकारत दिवसभर शाळेत अध्यापनाचे कार्य केले. सुरुवातीला क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त देवगाव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी ‘मास्तर’ बनले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर. महाजन, एस.के.महाजन, अरविंद सोनटक्के, विद्यार्थी मुख्याध्यापक रागिणी पाटील यांच्यासह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.…
आंबेडकर नगर भागातील नुकसानग्रस्त भरपाई मिळण्यापासून वंचित साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील जुन्या जळगावातील रथ चौकामधील कोल्हे वाड्याजवळील आंबेडकर नगर भागात गेल्या ४ जून २०२४ रोजी पावसामुळे परिसरातील वृक्ष उन्मळून घरांवर पडले होते. त्यात घरांचे नुकसान झाले होते. त्यामुळे गृहोपयोगी वस्तुंचे नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. यासंदर्भात नुकसानग्रस्त झालेल्यांनी संबंधित नगरसेवक, आ.सुरेश भोळे तसेच नवनिर्वाचित खा.स्मिता वाघ यांच्याकडे तोंडी स्वरुपात तक्रारी करुन नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, सहा महिन्याचा काळ उलटूनही अद्याप कुठलीही नुकसान भरपाई नुकसानग्रस्तांना मिळालेली नाही. त्यामुळे ते नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहिले आहे. यासाठी नुकसानग्रस्तांना न्याय देवून नुकसान भरपाई त्वरित मिळावी, अशी रास्त मागणी नुकसानग्रस्त…
म.ज्योतिबा फुलेंच्या जीवन चरित्रावर टाकला प्रकाश साईमत/जळगाव/प्रतिनिधी साने गुरुजी कॉलनीतील स्थित खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.निकम होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक जे.एस.चौधरी, पर्यवेक्षक के.आर.पाटील, पी.जी.पाटील, पी.व्ही.ठोके, ए.ए.पाटील उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर, समाजकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थी अक्षर जिरंगे, वेदिका दारकोंडे, दीपाली इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक एस.पी.निकम यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचलन आशिष पाटील तर आभार किरण पाटील यांनी मानले.
राज्यपालांची मंजुरी नाही, बंधाऱ्यात पाणी जमणार नसल्याचा मेरीचा अहवाल साईमत/सोयगाव/प्रतिनिधी सिल्लोड तालुक्यातील भराडी निम्न मध्यम प्रकल्पास राज्यपालांची मान्यता नसताना आचारसंहितेपूर्वी घाईगडबडीत तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजुरी मिळवून घेतली. त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने स्थगिती दिली. पाणलोट क्षेत्रात पुरेसे पाणी नसल्याने संबंधित प्रकल्पात पाणी साठणार नसल्याच्या ‘मेरी’च्या अहवालाकडे सत्तार यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. आधीच कोल्हापुरी बंधार असताना नव्याने नऊ साखळी बंधाऱ्यांवर ५३४.९२ कोटी रुपये खर्च करणे हा पैशाचा अपव्यय ठरेल, असा ठपका ठेवत न्या. मंगेश पाटील, न्या. प्रफुल्ल खुबाळकर यांनी प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली. सिल्लोडमध्ये महायुतीतील मित्रपक्ष शिंदे सेना व भाजपत मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे. शिंदेसेनेचे…
सायबर पोलीस स्टेशनला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे अमिष दाखवत खासगी ठेकेदाराची तब्बल दोन कोटी ७२ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. हा प्रकार २६ जून ते २६ नोव्हेंबर दरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमळनेर येथील खासगी ठेकेदाराला एका व्हाटस्ॲप ग्रुपमध्ये अजय गर्ग नामक व्यक्तीने ॲड केले. त्यानंतर या ग्रुपमधील रितू वोरा नामक व्यक्तीने लिंक पाठविली. एका ॲप्लिकेशनद्वारे शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवून देण्याचे अामिष दाखविले. त्यानुसार ठेकेदाराने ॲप्लिकेशन डाऊनलोड केले. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफ्याचे अामिष दाखविल्यानंतर ठेकेदाराने काही रक्कम गुंतविली. त्यावर एक हजार रुपये नफा…
नागरिकांचा ऊबदार कपडे खरेदीवर भर साईमत/सोयगाव/प्रतिनिधी शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अचानक थंडीत वाढ झाली आहे. गुरुवारी थंडीचा कडाका सायंकाळी पाच वाजेपासून सुरू होता.त्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या होत्या. ठिकठिकाणी शेकोट्या सुरु झाल्याने जुन्या काळासारखी चावडी सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण भागातही थंडीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक उबदार कपडे खरेदी करण्यावर भर देत आहे. सोयगावसह ग्रामीण भागात वाढलेली थंडी रब्बीच्या पिकांना फायदेशीर ठरली आहे. रब्बीच्या गहू, हरभरा, मका आदी पिकांना वाढीसाठी थंडीची गरज आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात पिकांना पुरेशी थंडी मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोट्याचे प्रमाण वाढलेले आहे.
सावित्रीबाई फुले विद्यालयात संविधान दिन साजरा साईमत/अमळनेर/प्रतिनिधी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य गायत्री भदाणे होत्या. यावेळेस सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी संविधानाची शपथ घेतली. यावेळी ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील, नितीन खंडारे, गोपाल हाडपे, समाधान पाटील, नीलिमा पाटील, रूपाली पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संदीप पवार व सुरेश पाटील यांनी परिश्रम घेतले. संविधानाचे वाचन तथा सूत्रसंचालन सुनील वाघ तर आभार दीपककुमार पाटील यांनी मानले.
भगीरथ शाळेत आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी ‘वाचा साने गुरुजींचे लेखन, घडेल तुमचे आदर्श जीवन’ असा सुंदर संदेश ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण यांनी कथाकथन प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला. कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ शाळेत साने गुरुजी कथाकथनाच्या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. साने गुरुजी कथामालेचे दुसरे पुष्प त्यांच्या हस्ते गुंफण्यात आले. यावेळी त्यांनी गुरुजींच्या जीवनातील विविध प्रसंग तसेच प्रमाणात हवे, उच्च ध्येय आणि संवेदनशीलता ह्या प्रेरणादायी व संस्कारक्षम कथा सांगितल्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.पी. निकम होते. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ प्रार्थनेने झाली. यावेळी पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेचे…
जरंडीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा स्तुत्य उपक्रम साईमत/सोयगाव/प्रतिनिधी तालुक्यातील जरंडी येथील अपघातात ठार झालेल्या दोन्ही मयतांच्या वारसांना गुरुवारी जरंडी येथील ग्रामीण बँकेच्यावतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवन सुरक्षा विमा योजनेच्या मंजूर रक्कमेचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. येथील गणेश पवार व राहुल राठोड या दोन तरुणांचा सुपा येथे अपघातात मृत्यू झाला होता. दोघांना जरंडी येथील ग्रामीण बँकेने जीवन ज्योती व जीवन सुरक्षा विमा योजनेचा लाभ देऊन वैशाली गणेश पवार व देवकाबाई लिंबाजी राठोड या वारसदार यांना बँकेचे व्यवस्थापक अक्षय भुतेकर यांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी डॉ.गोपाल पवार, व्यवस्थापक अक्षय भुतेकर, सह व्यवस्थापक हेमंत पाटील,…