अमळनेरच्या खासगी ठेकेदाराची तब्बल पावणे तीन कोटींची फसवणूक

0
10

सायबर पोलीस स्टेशनला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे अमिष दाखवत खासगी ठेकेदाराची तब्बल दोन कोटी ७२ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. हा प्रकार २६ जून ते २६ नोव्हेंबर दरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमळनेर येथील खासगी ठेकेदाराला एका व्हाटस्‌ॲप ग्रुपमध्ये अजय गर्ग नामक व्यक्तीने ॲड केले. त्यानंतर या ग्रुपमधील रितू वोरा नामक व्यक्तीने लिंक पाठविली. एका ॲप्लिकेशनद्वारे शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवून देण्याचे अामिष दाखविले. त्यानुसार ठेकेदाराने ॲप्लिकेशन डाऊनलोड केले. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफ्याचे अामिष दाखविल्यानंतर ठेकेदाराने काही रक्कम गुंतविली. त्यावर एक हजार रुपये नफा म्हणून त्यांच्या खात्यावर जमा केला. त्यातून विश्वास संपादन करत त्यांना अधिकची रक्कम गुंतविण्यास सांगितली. मात्र, नंतर ते रक्कम गुंतवत गेले. त्यांना कोणताही नफा दिला नाही, की मुद्दलही परत दिली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अजय गर्ग व रितू वोरा नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here