म.ज्योतिबा फुलेंच्या जीवन चरित्रावर टाकला प्रकाश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
साने गुरुजी कॉलनीतील स्थित खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.निकम होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक जे.एस.चौधरी, पर्यवेक्षक के.आर.पाटील, पी.जी.पाटील, पी.व्ही.ठोके, ए.ए.पाटील उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर, समाजकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थी अक्षर जिरंगे, वेदिका दारकोंडे, दीपाली इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक एस.पी.निकम यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचलन आशिष पाटील तर आभार किरण पाटील यांनी मानले.