सावित्रीबाई फुले विद्यालयात संविधान दिन साजरा
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी
येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य गायत्री भदाणे होत्या. यावेळेस सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी संविधानाची शपथ घेतली.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील, नितीन खंडारे, गोपाल हाडपे, समाधान पाटील, नीलिमा पाटील, रूपाली पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संदीप पवार व सुरेश पाटील यांनी परिश्रम घेतले. संविधानाचे वाचन तथा सूत्रसंचालन सुनील वाघ तर आभार दीपककुमार पाटील यांनी मानले.