सत्तारांनी मंजूर करून घेतलेला ५३५ कोटींचा बंधारा प्रकल्प स्थगित

0
7

राज्यपालांची मंजुरी नाही, बंधाऱ्यात पाणी जमणार नसल्याचा मेरीचा अहवाल

साईमत/सोयगाव/प्रतिनिधी

सिल्लोड तालुक्यातील भराडी निम्न मध्यम प्रकल्पास राज्यपालांची मान्यता नसताना आचारसंहितेपूर्वी घाईगडबडीत तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजुरी मिळवून घेतली. त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने स्थगिती दिली.

पाणलोट क्षेत्रात पुरेसे पाणी नसल्याने संबंधित प्रकल्पात पाणी साठणार नसल्याच्या ‘मेरी’च्या अहवालाकडे सत्तार यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. आधीच कोल्हापुरी बंधार असताना नव्याने नऊ साखळी बंधाऱ्यांवर ५३४.९२ कोटी रुपये खर्च करणे हा पैशाचा अपव्यय ठरेल, असा ठपका ठेवत न्या. मंगेश पाटील, न्या. प्रफुल्ल खुबाळकर यांनी प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली. सिल्लोडमध्ये महायुतीतील मित्रपक्ष शिंदे सेना व भाजपत मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे.

शिंदेसेनेचे नेते व तत्कालीन पालकमंत्री सत्तार यांनी पूर्णा नदीवर मंजूर करवून घेतलेल्या नऊ साखळी बंधाऱ्यांच्या ७ ऑक्टोबर २०२४ रोजी मंजुरीच्या निर्णयास भाजपचे माजी आमदार सांडू आनंदा पाटील लोखंडे यांनी खंडपीठात आव्हान दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here