Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी नंदिनीबाई ज्युनिअर कॉलेजमध्ये दि. १३ सप्टेंबर रोजी बँक ऑफ बडोदा व नंदिनीबाई जुनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 11 वी व 12 वी च्या विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदविला निबंधासाठी हिंदी रोजी रोटी का जरिया व संत कबीर सच्चे समाज सुधारक हे विषय होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य सी. एस. पाटील, उपप्राचार्य एस. एस. नेमाडे, समन्वयक प्रा.आर .डी .वराडे, प्रा. डी. यू राठोड, प्रा.डी .एम .बारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा व्ही एम जोगी यांनी केले तर हिंदी दिना विषयी प्रा. स्वाती पाटील…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागातील पालकांसाठी पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती बनवण्याची स्पर्धा दि.१२ सप्टेंबर मंगळवार रोजी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये जवळ जवळ 70 पालकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमात सुरवातीला श्री गणेश व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य प्रवीण सोनावणे, समंवयिका अनघा सागडे, व परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात पालकांनी अतिशय सुंदर व सुबक पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवल्या. या स्पर्धेसाठी शाळेचे ज्येष्ठ कला शिक्षक रवींद्र भोईटे , योगेश पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक प्रसाद जोशी, द्वितीय क्रमांक स्वप्निल नेवे, तृतीय क्रमांक विलास पालीवाल तसेच योगेश चौधरी, दीप्ती साळी, शुभांगी येवले,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी हौसिंग सोसायटीची स्थापना जळगावमध्ये दि. ०९/०९/१९४८ ला झाली होती. तत्कालिन सहकारातील प्रस्थ कै. आप्पासाहेब पुंडलिकराव सुर्यवंशी यांनी काही सहकार्‍यांच्या माध्यमातून सहकारी हौसिंग सोसायटीची कल्पना प्रत्यक्षात आणली. अशा या दि जळगाव को-ऑप. हौसिंग सोसायटीचा नुकताच अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळा वृक्षारोपण, आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते व सर्व सभासदांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सकाळी ९.०० वाजता धर्मदाय उपायुक्त एम. डी. गाडे , सहा. धर्मदाय आयुक्त स्मिता धारगे , सहा. धर्मदाय आयुक्त रंजना ठवरे आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून अमृत महोत्सवी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गोदावरी हॉस्पिटल व नेत्रज्योती…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ मागील ३१ वर्षांपासून सामाजिक जनजागृती च्या अनुषंगाने देखाव्यांचे सादरीकरण करीत असते यासाठी गणेश मंडळाला सन २०१६ साली बेटी बचाव देखाव्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या अनुशंघाने यावर्षी बँकेच्या वतीने श्री समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर मध्ये स्थापित केलेल्या ११ मारूतींच्या देखाव्याचे भव्य सादरीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान,जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाच्या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी निलम जोशी तर उपाध्यक्षपदी मनीषा आवारे याची निवड करण्यात आली. जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाची नुकतीच बैठक झाली असून त्यात या वर्षी सर्व महिला सदस्यांची कार्यकारणी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी बळीराजाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सण पोळा अवघा एक दिवसांवर येऊन ठेपला आहे.शेतकरी आपल्या लाडक्या ‌‘सर्जा राजा’चा साजश्रुंगार करण्यासाठी धडपडत आहे मात्र महागाईमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यंदा साजश्रुंगार साहित्याच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे जळगावातील बाजारपेठेत दिसून आले. शेतात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काळ्या मातीत वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाच्या ऋणाची उतरण करण्यासाठी पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा ठरत आला आहे.यानिमित्ताने शहरातील बोहरा बाजार,सुभाषचौक,महात्मा गांधी मार्केट परिसरात बाजारपेठही सजली आहे. बैलांना पोळ्यानिमित्त सजावट करण्यासाठी आकर्षक वस्तू विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत मात्र या सर्व साहित्यांच्या कच्च्या मालाची दरवाढ व त्यावर लागलेल्या जीएसटीमुळे…

Read More

साईमत, पाचोरा ः प्रतिनिधी राज्य शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे.जळगाव जिल्ह्यात लोकहितांचे नवीन प्रकल्प सुरू करण्याबरोबरच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येईल. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात काल दिली.येथील एम.एम.कॉलेज ग्राऊंड येथे ‌‘शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांंचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याव्ोळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पणही करण्यात आले. याव्ोळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. याव्ोळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री मंत्री गिरीष महाजन, मदत…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी पुढच्या आठवडयात येणाऱ्या श्री गणेश उत्सवाचा पार्श्वभूमीवर दि. १२ सप्टेंबर मंगळवार रोजी आयुक्त यांचे कार्यालयीन दालनाचे  आ. राजूमामा भोळे यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  बैठकीस  आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त अविनाश गांगोडे, उपायुक्त निर्मला गायकवाड, सह आयुक्त अश्विनी गायकवाड, मनपा शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, मनपा विद्युत अभियंता एस एस पाटील, मुलेप श्री मुळे सर, नगरसचिव सुनील गोराणे,  बाधकाम विभागाचे अभियंता सुशांत मेढे, योगेश अहिरे, वीज विभागाचे नवी पेठ कक्षाचे सहाय्यक अभियंता दीपक पाटील तसेच स्थायी समिती  सभापती राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, डॉ. चंद्रशेखर पाटील  महापालिकेचे  सर्व विभाग प्रमुख  उपस्थित होते. बैठकीत श्री गणेश…

Read More

साईमत : धुळे : प्रतिनिधी शहरातील घनकचरा संकलनाचे काम एक दिवस बंद ठेवल्याने कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू ट्रान्स्पोर्टला महापालिका प्रशासनाने एक लाख २६ हजार रुपये दंड ठोठावला.दरम्यान, संस्थेला केलेला दंडामुळे कामात सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे दंडाची रक्कम भरून संस्था मोकळ्या होतात. त्यापेक्षा कितीतरी पटीने बिल वसूल केले जाते. त्यामुळे दंडाला या संस्था आता घाबरत नाहीत अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील घरस्तरावरील घनकचरा संकलनाचे काम महापालिकेने स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे या संस्थेला दिले आहे. साधारण दीड वर्षापासून संस्था धुळे शहरात काम करत आहे.त्यापूर्वी वॉटरग्रेस कंपनी हे काम करत होती. वॉटरग्रेसला महापालिकेने बाद केल्यानंतर हे काम स्वयंभू ट्रान्स्पोर्टला देण्यात आले आहे.…

Read More

साईमत : धुळे : प्रतिनिधी स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण टप्‍पा-२ अंतर्गत केंद्र व राज्‍य शासनातर्फे देशभर शाश्‍वत स्‍वच्‍छतेसाठी गावे हागणदारीमुक्‍त अधिक मॉडेल केली जात आहेत.जी गावे मॉडेल झाली आहेत अशा गावांमध्ये १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत दृश्यमान स्वच्छतेसाठी कुटुंबभेटी अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत हागणदारीमुक्त अधिक जिल्ह्यासाठी व शाश्वत स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ३१ ऑगस्ट २०२३…

Read More

साईमत : नवापूर : प्रतिनिधी जोशाबा सरकार युवा मंडळ संचलित साई संजीवनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या अंतर्गत नवापूर शहरात गेल्या पाच वर्षापासून एमटीएस जळगाव या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी होतात व परीक्षा केंद्र हे नवापूर असते. त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरापासून जीनियस की मेंटल मॅथ अकॅडमी येथे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या विकासासाठी मार्गदर्शन केले जात असते. अशा विविध बौद्धिक स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या बालकांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आले. एम टी एस परीक्षेतील इयत्ता दुसरी पासून ते सातवी पर्यंत विद्यार्थी सहभागी होत असतात. यांनी गेल्या फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत नंदूरबार केंद्रस्तरावर उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा…

Read More