साईमत धुळे प्रतिनिधी महापालिकेतून जन्म-मृत्युचे दाखले मोफत मिळण्याच्या विषयाला बुधवारी महासभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. यामुळे आता हे दाखले मोफत मिळणार आहेत. महापालिकेकडून धुळेकरांना विशिष्ट शुल्क आकारुन जन्म-मृत्युचे दाखले दिले जात होते. परंतु, या प्रक्रियेला उशीर लागत असल्याने नागरिकांना शुल्क देऊनही मनपात चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे धुळेकर त्रस्त होते.ही जनभावना लक्षात घेऊन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी महापालिकेकडे जन्म-मृत्युचे दाखले कुठलेही शुल्क न आकारता नागरिकांना मोफत द्यावेत, अशी मागणी केली होती. तो विषय बुधवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्या विषयाला महासभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.
Author: Saimat
साईमत नंदुरबार प्रतिनिधी नंदूरबार : पंतप्रधान किसान संपदा योजनेचा १० कोटींचा निधी कन्या सुप्रिया गावित यांचा फार्मकडे वळवला असून रेवा तापी औद्योगिक विकास कंपनीला दहा कोटी रुपयांची सबसिडी मिळाली आहे. यामुळे आता मंत्री विजयकुमार गावित यांच्या अडचणीत वाढ होणार असून भाजपमध्ये पण परिवार वाद असली असल्याचं चित्र आता समोर येत आहे. भाजप नेहमी काँग्रेसच्या परिवार वादावरून टीका करत असते. मात्र भाजपमध्ये सुद्धा परिवार वाद असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्या दोन कन्या असून डॉ. हिना गावित या भाजपच्या खासदार, तर दुसरी कन्या डॉ. सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेवर अध्यक्ष आहेत. या परिवार वादावरून काँग्रेस नेते…
साईमत धुळे प्रतिनिधी येथील करिश्मा पाकळे सध्या पुणेस्थित पीआयसीटी महाविद्यालयात संगणकीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. अंतिम वर्षातील प्रकल्प प्रशिक्षणाच्या कालावधीत तिची आंतरराष्ट्रीय पातळीवरील बारलेक्स उद्योगसमूहाने निवड केली. त्यात तिच्यासह ग्रुपने व्याजदरासंदर्भात बँकिंग सॉफ्टवेअर तयार केले. त्यामुळे प्रभावित बारलेक्स समूहाने तिच्या सॉफ्टवेअरचा स्वीकार केला असून, तिच्या यशाबद्दल प्रशंसाही केली जात आहे. करिश्माने येथील एसएसव्हीपीएस संस्थेच्या अभियांत्रिकीतील डिप्लोमा शाखेत ९५ टक्के गुण मिळवीत गुणवत्ता सिद्ध केली. या बळावर तिने पुणे येथील नामांकित पीआयसीटी संगणकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविला.तिने तिसऱ्या वर्षात ९३ टक्के गुण मिळविले. यानंतर प्रकल्प प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधीत तिची बारलेक्स समूहाने बँकिंग प्रकल्पासाठी निवड केली.यात अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करताना करिश्माच्या गुणवत्तेचे…
साईमत धुळे प्रतिनिधी महापालिका हद्दीत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासांतर्गत तब्बल ३१ कोटी ७३ लाख रुपयांवर खर्चाच्या कामांना महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. यात विविध प्रभागातील ३९ कामांचा समावेश आहे. याशिवाय सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविणे, रस्ते व क्रॉस ड्रेनेजची दुरुस्ती व आनुषंगिक कामांच्या विषयालाही स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली. महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली.सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. मनपा हद्दीत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासांतर्गत कामांसाठी आलेल्या निविदादरांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे विषय होते. स्लॅब ड्रेन, रस्ता काँक्रिटीकरण, जॉगिंग ट्रॅक, रस्ता डांबरीकरण, संरक्षक भिंत, स्ट्रीटलाइट, पूल…
साईमत धुळे प्रतिनिधी येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ४६ लाख रुपये खर्चाची जामफळ धरणातून तात्पुरती योजना कार्यान्वित झाली असून, पाणीटंचाईतून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा योजनेचे नारळ वाढवून उद्घाटन प्रभारी सरपंच सविता पाटील यांनी केले. येधे जामफळ धरणातून पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ती पूर्णत्वास येण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार असल्याने तात्पुरती योजना पूर्ण करण्यास आली.सध्या येथे दहा दिवसांआड पाणी मिळते. जामफळ प्रकल्पाच्या कामात दोनपैकी एक जलवाहिनी तोडण्यात आली, तसेच कूपनलिकेचे स्रोत आटल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली. ती टंचाई आजही कायम आहे. मात्र आजपासून तात्पुरत्या योजनेचे पाणी मिळण्यास सुरवात झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.…
साईमत धुळे प्रतिनिधी येथील गरीब कुटुंबातील शेतकरी निंबा वामन कोळी यांच्या गायीचा लम्पीच्या आजाराने मृत्यू झाला. घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. डॉ. महेश माळी यांनी तपासणी केली असता लम्पीच्या आजाराने मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले. गरीब कुटुंबातील निंबा कोळी यांची दोन एकर शेती असून, दुय्यम व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करीत होते. त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता.आधीच पावसाअभावी पिकांची स्थिती जेमतेम असताना दुधाळ गायीचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर संकट कोसळले असून, शासस्तरावरून मदत मिळावी, अशी मागणी निंबा कोळी यांनी केली आहे. दरम्यान, गावात लम्पीच्या आजाराने मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली असून, भीती निर्माण झाली आहे. लम्पीचे लसीकरण झाले असूनही आजार डोके वर…
साईमत नंदुरबार प्रतिनिधी आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यरत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार व तळोदा यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा दि. १७ सप्टेंबर रविवार रोजी दुपारी 2:00 ते 3:30 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सदरची माहिती, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की (तळोदा), प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी पत्रकान्वये दिली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धींगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी व विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व्हावी व विकसित व्हावी ह्या हेतूने शिक्षकांची…
साईमत अक्कलकुवा प्रतिनिधी आर. एफ. एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. सी. पी. सावंत यांनी डॉ. भूषण कुलकर्णी यांच्या सत्कार केला आणि त्यानंतर आरोग्य हे जीवनात किती महत्त्वाचे असून त्याची कशा पद्धतीने राखण केली पाहिजे याबाबतीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिबिरास लाभलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे रक्तदाब, उंची,वजन आणि नाडीचे ठोके तपासले. शिबिरास प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. विजय पाटील, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश्वरसिंग पाडवी, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अंकुश खोब्रागडे,…
साईमत अक्कलकुवा प्रतिनिधी आर. एफ. एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय अक्कलकुवा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाच्या वतीने मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत कलश संकलन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सी .पी. सावंत सर, रा.से. यो. जिल्हा समन्वयक विजय पाटील ,रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा राजेश्वरसिंग पाडवी, स.का. अधिकारी अंकुश खोब्रागडे सर, यांनी यावेळेस अमृत कलाशामध्ये मुठभर माती घेउन त्याचा सेल्फी फोटो घेतला व तो केंद्र सरकारने दिलेल्या लिंक वर अपलोड केला. मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भरत पाटील, प्रा. गोपाल शेंडे, प्रा. डॉ. मनोज मुधोळकर, प्रा. डॉ. मोहम्मद जुबेर शेख, प्रा. डॉ. योगेश दुशिंग, प्रा. डॉ. विनोद…
साईमत : जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन जळगाव यांच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत अमर डेअरी येथे कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमर डेअरीचे संचालक अक्षय खत्री होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्लांट हेड अविनाश चंदनशे, एच.आर.पी.एस.दिक्षीत, न्यु गणपती हॉस्पिटलचे कल्पेश सुर्यवंशी होते.यावेळी डॉ.मितेश घुगे,डॉ. कृतिका जाधव यांनी १५० कामगारांची बी.पी.,शुगर, इ.सी.जी. तपासणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी केले कार्यक्रमास राजेश जाधव,टी.सी.पाटील व न्यु गणपती हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.