Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी आमदार राजुमामा भोळे कर्तृत्वशून्य आहेतच अन्‌‍ त्यांची वृत्तीही संकुचित असल्याचे सांगत आज पत्रपरिषदेत महापालिकेतील विरोधी पक्षनेते  व महापौर जयश्री महाजन यांचे पती सुनिल महाजन यांनी आमदार राजुमामा भोळे यांच्या आमदारकीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लावत त्यांचा आडमूठपणा उजागर करणारे आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते  सुनिल महाजन पुढे म्हणाले की, स्वतःकाही करायचं नाही, फक्त कोणी काही  करत असेल तिथे े आडकाठी निर्माण करायची ; हेच काम मनापापसून करणारे आ. राजूमामा भोळे हे जिल्ह्यातील अन्य आमदारांपैकी  सर्वात कमी निधी आणणारे एकमेव आमदारठरले आहेत.सतत विकासकामात खोडा घालण्याचे काम आमदार राजूमामा भोळे यांनी केले आहे. जिल्ह्यात गिरीश…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीत कायम अग्रेसर राहिला आहे. ‘आयुष्यमान भव:’ या योजनेत ही जिल्ह्याचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणारे ‘आयुष्यमान कार्ड’ चे घरोघरी वितरण करण्याचे काम प्रशासनाने करावे. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. ‘आयुष्मान भव:’ अभियानांचा जळगाव जिल्ह्याचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, नागरिक यांच्यांशी फेसबुक लाईव्हद्वारे थेट संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असतांना राज्यातील दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना नाही. त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र घरकुल योजना राबविणार असल्याची ग्वाही ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली. महाबळ रोड येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर येथे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, स्वयंदिप फाउंडेशनच्या मिनाक्षी निकम, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षते खाली पार पडली असून त्या एकूण १७ ठराव सर्वानुमते पारित करण्यात आली. त्यात विशेष करून २५ डिसेंबरला सामूहिक विवाह, साखरपुडा मोठ्या प्रमाणात करणार नाही, साखरपुड्यात भावी नवरदेव ला सोन्याची अंगठी देण्यात येणार नाही, वधूकडे जास्त वराती घेऊन जाणार नाही, लग्नात डीजे वाजवला जाणार नाही, कोणीही व्यक्ती एकाच वेळी तीन तलाक देणार नाही, वधू वर मेळाव्याचे आयोजन, बिरादरीच्या भूखंडा वर शादी हॉल निर्माण करावा, प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुरुवात करावी, शैक्षणिक, वैद्यकीय व स्वयरोजगारासाठी बिरादी तर्फे आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यात यावी असे एकूण १७ ठराव सर्व…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील इच्छा देवी चौकात जळगाव शहर व जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत तसेच जनतेच्या साक्षीने रविवार दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस पकोडे तळून राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मोदी सरकार विरोधात आक्रोश पदवीधर युवकांना बेरोजगार करण्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचा निषेध व्यक्त करण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशातील युवकांना दरवर्षी दोन करोड नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन दिले आज मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु अद्याप देशातील कुठल्याही युवकाला…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगानेभाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा अ.भा. क्षत्रिय नामदेव महासंघांचे राज्य संघटक मनोज भांडारकर यांनी त्याच्या जिवनातील २५ व्यांदा म्हणजेच रौप्यमहोत्सवी रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला. भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा अ.भा. क्षत्रिय नामदेव महासंघांचे राज्य संघटक मनोज भांडारकर यांनी इंडियन रेडक्रास सोसायटी येथे रविवारी सकाळी ११ वाजता रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला. यावेळी इंडियन रेडक्रास सोसायटीचे डॉ. अरविंद चौधरी, उज्वला वर्मा, उमाकांत शिंपी यांनी रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “यमन को नमन” सोनेरी यादे हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी केसीई सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील, सहसचिव ॲड.प्रवीणचंद्र जंगले, कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, हरीश मिलवानी व प्राचार्य संजय भारंबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रास्ताविक शशिकांत वडोदकर यांनी केले. ओ शाम कुछ अजीब थी, वो जब याद आये, जब दीप जले आना, नाम गुम जायेगा, इस मोड से जाते है ,अभी ना जाओ छोडकर ,चंदन सा बदन, जो वादा किया वो निभाना…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालातील विद्युत अभियांत्रिकी शाखेतर्फे अभियंता दिनानिमित्त “प्रश्न मंजुषा”  स्पर्धा घेण्यात आली.  स्पर्धेचे उदघाटन आणि दीप प्रज्वलन प्राचार्य डॉ .संजय सुगंधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकॅडेमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, विभागाध्यक्ष प्रा. प्रसाद कुलकर्णी,  प्रा. राजेश वाघुळदे, प्रा. के. एम.  महाजन, प्रा. प्रवीण भंगाळे, प्रा. अश्विनी पाटील, आणि इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ७० विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली, त्यातून अंतिम फेरीसाठी १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रत्येकी तीन विद्यार्थी असे पाच गट तयार करण्यात येऊन प्रत्येक गटाला वैद्न्यानिकांची नावे देण्यात आली. अंतिम स्पर्धेसाठी एकूण पाच फेऱ्या घेण्यात…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील शिवाजीनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सुरक्षितता व कामकाजा संदर्भात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, धनंजय चौधरी यांनी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व जिल्हा प्रशासन यांच्या समनव्य बैठकीत छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळाकडून छत्रपती शिवाजी नगर भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक संबंधित विषय मांडण्यात आला. त्याची पुढील अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, सूरज दायमा, धनंजय चौधरी आदींमध्ये स्मारकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील उपाययोजना करण्यासाठी चर्चा झाली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासन पुरस्कृत माझी वसुंधरा अभियान ४.० च्या अनुषंगाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशातून महानगरपालिका व मानव सेवा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा मानव सेवा विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून सुबक अश्या गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत. सदर कार्यशाळेचे आयोजन मानव सेवा विद्यालय जळगाव माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा तुळशीराम सूर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया विलासचंद्र आंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता प्रमोद पाटील, शिक्षक अलका अनिल महाजन, रत्ना भागवत चोपडे, अनिल राजेश शिरसाठ, गिरीश हिरालाल जाधव तसेच महानगरपालिकेतर्फे योगेश वाणी पर्यावरण विभाग आदी मार्फत करण्यात आले होते.…

Read More