साईमत जळगाव प्रतिनिधी
जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षते खाली पार पडली असून त्या एकूण १७ ठराव सर्वानुमते पारित करण्यात आली.
त्यात विशेष करून २५ डिसेंबरला सामूहिक विवाह, साखरपुडा मोठ्या प्रमाणात करणार नाही, साखरपुड्यात भावी नवरदेव ला सोन्याची अंगठी देण्यात येणार नाही, वधूकडे जास्त वराती घेऊन जाणार नाही, लग्नात डीजे वाजवला जाणार नाही, कोणीही व्यक्ती एकाच वेळी तीन तलाक देणार नाही, वधू वर मेळाव्याचे आयोजन, बिरादरीच्या भूखंडा वर शादी हॉल निर्माण करावा, प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुरुवात करावी, शैक्षणिक, वैद्यकीय व स्वयरोजगारासाठी बिरादी तर्फे आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यात यावी असे एकूण १७ ठराव सर्व संमतीने पारित करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष फारुक शेख, कार्याध्यक्ष सय्यद चांद, डॉक्टर फारूक साबीर शेख, रउफ रहीम, ताहेर इब्राहिम, अडव्होकेट आमीर शेख, (सर्व जळगाव) गफुर करीम (एरंडोल) हकीम चौधरी,(मुक्ताई नगर) रफिक बिस्मिल्ला, (४० गाव) इकबाल तकी( धरणगाव) रफिक नादर (बोदवड) इब्राहिम बिस्मिल्ला ( शिरसोली) दगडू वजीर (भडगांव) हाफिझ शेख (यावल) कलीम हैदर ( फैजपूर) अजिज अमीर (पाळधी) मुनाफ महमूद (जामनेर) शब्बीर रशीद व मुदस्सर अल्ताफ (अडावद), इस्माईल शेख व रियाझ सैयद (नशिराबाद) वसिम निसार (पारोळा) आरिफ हनीफ (चोपडा) आदी १५ तालुक्याचे पदाधिकारी व सभासद यांची उपस्थिती होती.
सभेच्या चर्चेत रफिक शेख (अडावद) मौलाना फिरोज साकेगाव, मोहम्मद इद्रिस इकबाल जळगाव, डॉ अताउल्ला, हुसेन जनाब अमळनेर, इकबाल वजीर, खलील टेलर,हमिद हवालदार, मुश्ताक हवालदार यांनी सहभाग घेतला. सभेचे कामगाज सचिव अजिज शेख, सूत्र संचलन असलम शेख (साकली ), आसिफ शेख,रऊफ शेख ( न्हावी),अब्दुल रज्जाक ( अडावद) व साजिद सईद यांनी केले. सभेची सुरवांत रफिक खान यांचे कुराण पठणाने, तर नात अलिना मुख्तार व अलीना साजिद या मुलींनी सादर केली आभार ताहेर शेख यांनी मानले